माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय सिनेमा आणि सॉफ्ट पॉवर यावर मुंबईत 3 आणि 4 मे 2022 रोजी दोन दिवसांचे आयसीसीआर चर्चासत्र


नामवंत चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या हस्ते राजभवनात होणार चर्चासत्राचे उद्घाटन

Posted On: 02 MAY 2022 4:47PM by PIB Mumbai

मुंबई, 2 मे 2022

 

सांस्कृतिक संबंध विषयक भारतीय परिषद (आयसीसीआर) आणि फ्लेम युनिवर्सिटी यांनी मुंबईत 3 आणि 4 मे 2022 रोजी भारतीय सिनेमा आणि सॉफ्ट पॉवर या विषयावर दोन दिवसांच्या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. भारतीय सिनेमा आणि आंतरराष्ट्रीय संबध या क्षेत्रामधील व्यावसायिक आणि विद्वान यांना समकालीन वाटचालीसंदर्भात विचारमंथन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि भूमिका मांडण्यासाठी एकत्र आणण्याच्या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय सिनेमा आणि सॉफ्ट पॉवर यावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन नामवंत दिग्दर्शक शेखर कपूर करणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी आणि आयसीसीआऱचे अध्यक्ष श्री विनय सहस्त्रबुद्धे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. माहिती आणि प्रसारणमंत्री श्री अनुराग ठाकूर चार मे रोजी होणाऱ्या या चर्चासत्राच्या समारोप सत्राला संबोधित करतील.

सुभाष घई, रुपा गांगुली, भारत बाला, अंबरिश मिश्रा, अरुणाराजे पाटील, अशोक राणे, मीनाक्षी शेडे, मनोज मुतासिर, परेश रावल आणि जी पी विनय कुमार यांसारख्या नामवंत व्यक्तिमत्वांकडून चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भूषवण्यात येईल.

सिनेमा हे सॉफ्ट पॉवरचे एक महत्त्वाचे साधन आहे. भारतीय सिनेमामध्ये भारताविषयीच्या सांस्कृतिक जाणीवा जागृत करण्यासाठी आणि भारतीय समुदायासोबत धोरणात्मक संपर्क वाढवण्यासाठी चित्रपट निर्मिती आणि धोरणांची रचना करण्याची असलेली क्षमता यावर या चर्चासत्रात चर्चा होणार आहे.

या चर्चासत्रात भारतीय सिनेमा आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रातील विद्वान सिनेमॅटिक वसाहतवाद, भारतीय सिनेमॅटिक संगीताचा जागतिक प्रभाव, प्रादेशिक सिनेमा आणि त्याचा जागतिक प्रभाव यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

भारतीय सिनेमाचा आवाका खूप मोठा असून त्यामध्ये भारताविषयीच्या सांस्कृतिक संवेदनशीलतेविषयी जागरुकता निर्माण करण्याची क्षमता आहे. सातत्याने वाढणाऱ्या भारतीय समुदायाच्या आकारमानासोबत माहिती तंत्रज्ञानामधील वाढ यामुळे परदेशातही भारतीय सिनेमाच्या प्रभावाचे मूल्यमापन करणे आणि त्याचे अध्ययन करणे महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळात विद्वानांनी केलेल्या कामाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाहन करण्यावर  आणि प्रेक्षकांवर प्रभाव निर्माण करण्यावर भर दिला आहे. हाच ओघ पुढे सुरू ठेवण्यासाठी आणि सिनेमॅटिक प्रभावांची भूमिका सविस्तर जाणून घेण्यासाठी आणि त्याचा सॉफ्ट पॉवरसोबत असलेला संबंध यांचे विश्लेषण करण्यासाठी या चर्चासत्राच्या रुपाने संधी निर्माण झाली आहे.

 

या चर्चासत्रामध्ये खालील सत्रे होणार आहेत:

1.   सिनेमॅटिक वसाहतवादः जागतिक आणि भारतीय सिनेमा पाश्चात्यांच्या नजरेतून

2.  परदेशामध्ये भारत या संकल्पनेबाबत जागरुकतेचा प्रसार करण्यासाठी भारतीय सिनेमाचा एक वाहक म्हणून उपयोग

3.  प्रादेशिक सिनेमा आणि त्याचा जागतिक प्रभाव

4.   भारतीय सिनेमाचा परदेशी प्रेक्षकांसोबत वाढीव संपर्क आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान

 

* * *

PIB Mumbai | S.Tupe/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1822024) Visitor Counter : 194


Read this release in: English