विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या विविध शिष्यवृत्ती, संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम आणि व्यावसायिक पर्यायांचा लाभ घ्यावा - भारतीय स्टार्टअप आणि बर्लिनमध्ये पोस्ट डॉक्टरेट, डॉक्टरेट आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे आवाहन
Posted On:
01 MAY 2022 7:37PM by PIB Mumbai
जर्मनीत आगमन झाल्यानंतर लगेचच केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज बर्लिनमध्ये भारतीय स्टार्ट-अप, विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या विविध फेलोशिप, संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम आणि व्यावसायिक पर्यायांचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्र्यांनी त्यांना केले. पोस्ट डॉक्टरेट, डॉक्टरेट आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या भारतीय विद्यार्थ्यांना त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषात अत्याधुनिक संशोधन करण्यासाठी मायदेशी नवनवीन संधींचा लाभ घ्यावा असे सांगितले.
जर्मनीचे फेडरल चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जर्मनी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याचा एक भाग म्हणून डॉ जितेंद्र सिंह बर्लिनमध्ये त्यांच्या जर्मन समकक्षांशी सल्लामसलत करण्यासाठी आहेत.
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1821864)
Visitor Counter : 175