संरक्षण मंत्रालय

लेफ्टनंट जनरल बग्गावल्ली सोमशेखर राजू 1 मे 2022 रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार

Posted On: 29 APR 2022 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2022

 

लेफ्टनंट जनरल बग्गावल्ली सोमशेकर राजू 1 मे 2022 रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील.

सैनिक स्कूल विजापूर आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे  माजी विद्यार्थी असलेल्या राजू यांना  15 डिसेंबर 1984 रोजी जाट रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले.

वेस्टर्न थिएटर आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांनी आपल्या बटालियनचे नेतृत्व केले. काश्मीर खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळील उरी ब्रिगेड, काउंटर इन्सर्जन्सी फोर्स आणि  चिनार कॉर्प्स चे कमांडिंग अधिकारी म्हणूनही त्यांची विशेष कामगिरी आहे. जनरल अधिकाऱ्यांनी भूतानमध्ये भारतीय लष्करी प्रशिक्षण संघाचे कमांडंट म्हणूनही काम केले आहे. .

38 वर्षांच्या आपल्या गौरवशाली कारकिर्दीत ते लष्कराच्या मुख्यालयात अनेक महत्त्वाच्या रेजिमेंट, अधिकारी आणि निर्देशात्मक नियुक्त्यांमध्ये सामील होते. तसेच आणि फील्ड फॉर्मेशनमध्ये लष्करी सचिव शाखेत कर्नल मिलिटरी सेक्रेटरी लीगल,  व्हाईट नाइट कॉर्प्सचे ब्रिगेडियर जनरल स्टाफ, उपमहासंचालक मिलिटरी ऑपरेशन्स आणि महासंचालक स्टाफ ड्युटी यासारखी पदे भूषवली आहेत.

लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ झालेल्या संघर्ष  दरम्यान ते लष्करी कारवाईचे महासंचालक म्हणून नियुक्तीवर होते.

सेवेतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि युद्ध सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

* * *

S.Kane/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821374) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu , Hindi