सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

एमएसएमई शाश्वत (ZED) प्रमाणीकरण योजनेचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला प्रारंभ, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांशी समन्वय साधण्याच्या प्रयत्नांवर साधला संवाद, भविष्यासाठी एमएसएमई परिसंस्था तयार करण्यासाठी विकसित केला लक्ष्यीत दृष्टीकोन

Posted On: 28 APR 2022 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2022 

 

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज एमएसएमई शाश्वत (ZED) प्रमाणीकरण योजनेचा प्रारंभ केला. आपल्या भाषणात, मंत्री म्हणाले की झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट ZED अर्थात दोषरहित उत्पादन निर्मितीत राष्ट्रीय चळवळ बनण्याची क्षमता आहे आणि भारतातील एमएसएमई साठी जागतिक स्पर्धात्मकतेचा आराखडा प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. ते पुढे म्हणाले की ZED केवळ उत्पादकता आणि कार्यप्रदर्शन सुधारण्याचा प्रयत्न करणार नाही, तर उत्पादकांची मानसिकता बदलण्याची आणि त्यांना अधिक पर्यावरण जागरूक बनविण्याची क्षमता त्यात आहे.

ही योजना सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांना झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट (ZED) पद्धतींचा अवलंब करून त्यांना एमएसएमई विजेते बनण्यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच ZED प्रमाणीकरण साठी प्रेरित आणि प्रोत्साहन देण्यासाठी सक्षम आणि सुलभ करण्यासाठी एक विस्तृत मोहीम आहे. ZED प्रमाणपत्राच्या माध्यमातून, एमएसएमई अपव्यय कमी करू शकतात, उत्पादकता वाढवू शकतात, पर्यावरणीय जागृती वृद्धिंगत करू शकतात, ऊर्जा वाचवू शकतात, नैसर्गिक संसाधनांचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतात, त्यांच्या बाजारपेठांचा विस्तार इत्यादी गोष्टी करू शकतात.

योजनेंतर्गत, एमएसएमई ना ZED प्रमाणीकरण  खर्चावर खालील संरचनेनुसार अनुदान मिळेल:

• सूक्ष्म उद्योग: 80%

• लघु उद्योग: 60%

• मध्यम उद्योग: 50%

महिला/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती उद्योजकांच्या मालकीचे एमएसएमई किंवा ईशान्येकडील प्रदेश/हिमालय/नक्षलवादग्रस्त राज्य/द्वीप प्रदेश/आकांक्षी जिल्ह्यांमधील एमएसएमई साठी 10% अतिरिक्त अनुदान असेल. याव्यतिरिक्त, मंत्रालयाच्या स्फूर्ती किंवा सूक्ष्म आणि लघु उद्योग - समूह विकास कार्यक्रमाचा (MSE-CDP) एक भाग असलेल्या एमएसएमई साठी 5% अतिरिक्त अनुदान असेल. तसेच एकदा ZED प्रमाणीकरण  घेतल्यावर मर्यादित उद्देशाने सामील होण्यासाठी बक्षीस म्हणून प्रत्येक एमएसएमई ला 10,000/- रुपये देऊ केले जातील. 

दोषरहित उत्पादन उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी सहाय्य म्हणून ZED प्रमाणन अंतर्गत एमएसएमई ना पाठबळ आणि सल्लामसलत समर्थनासाठी 5 लाख रुपयांपर्यंतची (प्रति एमएसएमई) तरतूद करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, वित्तीय संस्था इत्यादींद्वारे ZED प्रमाणीकरण साठी देऊ केलेल्या इतर अनेक प्रोत्साहनांचा देखील लाभ एमएसएमई घेऊ शकतात आणि एमएसएमई कवच (COVID-19 विरुद्ध पाठबळ) उपक्रमांतर्गत विनामूल्य प्रमाणपत्रासाठी देखील अर्ज करू शकतात.

 

* * *

S.Kane/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1821043) Visitor Counter : 244


Read this release in: English , Urdu , Hindi