सांस्कृतिक मंत्रालय
नेहरू विज्ञान केंद्र मुलांसाठी सर्जनशील विज्ञान कार्यशाळा(क्रिएटिव्ह सायन्स) आयोजित करत आहे
तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या नवनिर्मिती करत आणि सर्जनशीलपणे व्यतीत करा
प्रविष्टि तिथि:
27 APR 2022 11:05PM by PIB Mumbai
मुंबई, 27 एप्रिल 2022
नेहरू विज्ञान केंद्र या उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी सर्जनशील विज्ञान कार्यशाळा (क्रिएटिव्ह सायन्स) आयोजित करत आहे. जेणेकरून मुलांना त्यांच्या सुट्ट्या सर्जनशील पद्धतीने घालवता येतील. या कार्यशाळा ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीनेही होणार आहेत.
1 मे 2022 ते 05 जून 2022 या कालावधीत नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई येथे रोबोटिक्स, थ्रीडी मॉडेलिंग आणि प्रिंटिंग, एरो मॉडेलिंग यासह अनेक मनोरंजक विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.
या कालावधीत सर्जनशील चित्रकला आणि हस्तकला (क्रिएटिव्ह आर्ट अँड क्राफ्ट), अर्डिनो कार्यशाळा, खेळण्यांच्या कार्यशाळेशिवाय मनोरंजक रसायनशास्त्र आणि, ‘लर्न थ्रू द फन वर्कशॉप',या विषयांवर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.
कार्यशाळा आणि पद्धतींचा संपूर्ण तपशील खाली दिला आहे: वेळापत्रक


* * *
PIB Mumbai | S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1820936)
आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English