माहिती आणि प्रसारण मंत्रालय
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 22 एप्रिल 2022 रोजी गोवा फिल्ड आउटरीच ब्युरोतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
Posted On:
21 APR 2022 5:00PM by PIB Mumbai
गोवा, 21 एप्रिल 2022
माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत गोवा फील्ड आउटरीच ब्युरो (FOB), गोवा उपजीविका मंच आणि गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने, 22 एप्रिल 2022 रोजी 'जागतिक वसुंधरा दिन' साजरा करत आहे. "कचऱ्यापासून संपत्ती" या विषयावर कार्यशाळा आणि "जागतिक वसुंधरा दिन" समारंभाच्या स्मरणार्थ "वसुंधरा संवर्धन" या विषयावर जादूच्या प्रयोगांचा कार्यक्रम करत मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. “इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट” ही यावर्षीच्या “जागतिक वसुंधरा दिनाची” संकल्पना आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल गोवा बचत गट संघटनेच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत करणार आहेत.
कार्यक्रमपूर्व प्रसिद्धीचा एक भाग म्हणून, FOB ने बिचोलीम तालुक्यातील स्वयंसहाय्यता गटांसाठी न्यूट्री गार्डन्सवर स्पर्धा आयोजित केली आहे. गोवा सरकारच्या कृषी विभागाचे माजी संचालक नेल्सन फिगेरेडोयांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने न्यूट्री गार्डनला भेट दिली.
R.Aghor/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1818737)
Visitor Counter : 165