राष्ट्रपती कार्यालय

महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 13 APR 2022 7:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2022

राष्ट्रपती राम  नाथ कोविंद यांनी महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला आपल्या संदेशात म्हटले आहे:-

महावीर जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, मी सर्व देशवासीयांना, विशेषत: जैन समाजाला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो.

भगवान महावीरांनी अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य (पावित्र्य) आणि अपरिग्रह (धनसंचय न करणे) या व्रतांचे पालन करून आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग दाखवला.  संतुलित मानवी जीवन जगण्यासाठी त्यांनी त्याग, संयम, प्रेम, करुणा, नम्रता आणि सदाचरण  यांची शिकवण दिली.

यानिमित्ताने आपण सर्वांनी अहिंसेचा प्रसार आणि समाजातील सर्व प्रकारच्या सामाजिक दुष्कृत्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कार्य करण्याचा  संकल्प करूया .

राष्ट्रपतींचा संदेश हिंदीत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

S.Kulkarni/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1816536) Visitor Counter : 133