कंपनी व्यवहार मंत्रालय

‘बीआयएस’ मुंबई अधिका-यांकडून हेल्मेटच्या गुणवत्तेची तपासणी आणि मुंबईत शोध मोहीम तसेच जप्तीची कारवाई

Posted On: 11 APR 2022 4:44PM by PIB Mumbai

मुंबई - दि. 11 एप्रिल, 2022

बीआयएस म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडडर्सच्या मुंबई शाखेच्यावतीने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे पालन न करणा-या हेल्मेटची तपासणी केली. आणि मेसर्स लेझी अॅस बायकर्स (प्रोजेक्ट रिव्हॉल्ट एलएलपी) येथे दि. 3 डिसेंबर, 2021 रोजी अंमलबजावणी शोध आणि जप्तीची कारवाई केली.

प्रस्तुत दुकान  मुंबईतल्या अंधेरी (पूर्व) मध्ये चकाला, कार्डिनल ग्रेशिअस मार्गावर असलेल्या नहार आणि सेठ औद्योगिक वसाहतीमध्ये आहे. दुचाकी स्वारांसाठी तयार करण्यात येणा-या हेल्मेटच्या गुणवत्ता विषयक आदेशांचे होणारे उल्लंघन रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली . या दुकानामध्ये बीआयएस मानक चिन्हाशिवाय (आयएसआय मार्क) हेल्मेटची विक्री केली जात असल्याचे आढळले. 

बीएसआय स्टँडर्ड मार्क  (आयएसआय मार्क) असलेली 90 हेल्मेट जप्त करण्यात आली. दुचाकी वाहन धारकांसाठी हेल्मेटच्या गुणवत्ता नियंत्रण आदेश, 2020 नुसार वाहनचालकांच्या संरक्षणासाठी हेल्मेट अनिवार्य असून ते बीआयएस प्रमाणन अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. आणि बीआयएसच्या परवान्यानुसार मानक चिन्ह असलेले हेल्मेट असणे गरजेचे आहे.

बीआयएस कायदा, 2016च्या कलम 16 आणि 17 अनुसार, वैध परवान्याशिवाय, कोणीही व्यक्ती मानक चिन्हाच्या हेल्मेटचे उत्पादन, आयात, वितरण, विक्री, भाड्याने देवू शकत नाही तसेच दुकानामध्ये विक्रीसाठी प्रदर्शन करू शकत नाही.

ज्यांच्याकडून या कलम 20 आणि 21 अंतर्गत केंद्रीय प्राधिकरणाच्या कोणत्याही निर्देशांचे पालन केले जात नाही, त्यांना सहा महिन्यापर्यंत कारावासाची किंवा वीस लाख रूपयांपर्यंत दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात.

हेल्मेटमुळे अनेक सुरक्षेविषयक समस्यांचे निराकरण होत असल्याची माहिती नागरिकांना/सामान्य जनतेला देण्यात आली आहे. त्यामुळे भारत सरकारने दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र दुचाकी स्वारांनी बीआयएस व्दारे प्रमाणित केलेले हेल्मेटच वापरावे. तसेच उत्पादक, आयातदार आणि विक्रेते यांनी बीआयएसच्या परवान्याशिवाय अशा वस्तू, विकणे ताबडतोब बंद करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

***

S.Kane/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1815665) Visitor Counter : 183


Read this release in: English