माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अमरनाथजी यात्रा 2022 च्या प्रचाराबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव घेणार बैठक

प्रविष्टि तिथि: 10 APR 2022 6:40PM by PIB Mumbai

आगामी 30 जून 2022 ते  11 ऑगस्ट 2022 या कालावधीत नियोजित  श्री अमरनाथजी यात्रेच्या व्यापक प्रचाराबाबत भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी उद्या श्रीनगरमध्ये एक बैठक बोलावली आहे.

 

या बैठकीला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांसह जम्मू आणि काश्मीर सरकारचे मुख्य सचिव अरुण कुमार मेहता, श्री अमरनाथजी श्राइन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश कुमार, जम्मू आणि काश्मीर सरकारचे प्रधान सचिव रोहित कंसल आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी -   माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय,आकाशवाणीचे प्रधान महासंचालक (वृत्त)  एन.व्ही. रेड्डी,  दूरदर्शनचे  महासंचालक मयंक अग्रवाल ,श्रीनगरच्या पत्र सूचना कार्यालयाचे  अतिरिक्त महासंचालक  राजिंदर चौधरी आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


 संभाव्य यात्रेकरूंसाठी  उपयुक्त ठरेल असा  या वर्षी होणार्‍या यात्रेसंदर्भातील  माहितीचा प्रचार - प्रसार व्हावा  याबाबत या बैठकीत  चर्चा करण्यात येणार आहे.यात्रेच्या संपूर्ण कालावधीत जम्मू आणि काश्मीर प्रशासनाच्या सहकार्याने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध माध्यम घटकांद्वारे विविध प्रचारात्मक उपक्रमांचे  नियोजन केले जाईल.

या संदर्भात माहिती आणि प्रसारण  मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी जम्मू आणि काश्मीर या  केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत.

***


Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1815576) आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu