कंपनी व्यवहार मंत्रालय
भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ ( ऐच्छिक अवसायन प्रक्रिया ) नियम 2017 मध्ये भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाने केली सुधारणा
Posted On:
08 APR 2022 9:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2022
भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाने 05 एप्रिल, 2022 रोजी भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ (ऐच्छिक अवसायन प्रक्रिया) (सुधारणा) विनियम, 2022 (सुधारणा नियम) अधिसूचित केले आहेत.
नादारी आणि दिवाळखोरी संहिता, 2016 भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ ( ऐच्छिक अवसायन प्रक्रिया) विनियम, 2017 सह दिवाळखोर समुदायातील व्यक्तीच्या ऐच्छिक अवसायनासाठी यंत्रणा प्रदान करतात.
ऐच्छिक अवसायन प्रक्रियेदरम्यान अवसायनात काढणाऱ्या व्यक्तीने केलेल्या कृतीचा सारांश देण्यासाठी ,सुधारित विनियम अनुपालन प्रमाणपत्र निर्दिष्ट करतात, हे प्रमाणपत्र अवसायनात काढणाऱ्या व्यक्तीने कलम 59(7) अन्वये अर्जासोबत निर्णय प्राधिकरणाकडे सादर करणे आवश्यक आहे.ते बरखास्तीच्या अर्जांवर त्वरित निर्णय घेण्यासाठी न्यायनिवाडा करणार्या प्राधिकरणाला मदत करेल.
सुधारित विनियम 05 एप्रिल 2022 पासून लागू झाले आहेत. www.mca.gov.in आणि www.ibbi.gov.in. या संकेतस्थळांवर ते उपलब्ध आहेत.
S.Kane/S.Chavan/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1815077)
Visitor Counter : 254