जलशक्ती मंत्रालय
जलजीवन अभियान : महाराष्ट्रातील 70 टक्के ग्रामीण घरात नळाचे पाणी
जलजीवन अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 55.10 लाख ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पाणी
Posted On:
07 APR 2022 9:43PM by PIB Mumbai
मुंबई, 7 एप्रिल 2022
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील एकूण 146.09 लाख घरांपैकी 103.54 लाख म्हणजे 70.88% घरांमध्ये 04 एप्रिल 2022 रोजीपर्यंत नळाच्या पाण्याची जोडणी पोहोचली आहे. जल जीवन अभियान 2019 घोषित झाले तेव्हा महाराष्ट्रातील केवळ 48.44 लाख म्हणजे 33 टक्के ग्रामीण घरात नळाच्या पाण्याच्या जोडण्या होत्या. त्यानंतर पाण्यासाठीच्या नळजोडणीत 55.10 लाख म्हणजे 37.72 टक्के घरांची भर पडली.
जलशक्ती मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी लोकसभेत आज एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
जलजीवन अभियान
महाराष्ट्रासह देशाच्या प्रत्येक राज्यातील ग्रामीण भागात 2024 पर्यंत नळाचे पाणी पोचवण्यासाठी केंद्र सरकार ऑगस्ट 2019 पासून ‘जलजीवन अभियान- हर घर जल’राज्यांसोबतच्या भागीदारीतून राबवत आहे.
S.Kulkarni/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1814625)
Visitor Counter : 206