पर्यटन मंत्रालय
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ‘शेड्युल्ड कास्ट वेलफेअर असोसिएशन आणि रिबिल्ड इंडिया ट्रस्ट-गोवा’ यांच्या स्मरणिकेचे प्रकाशन
अनूसूचित जातीतील व्यक्तींचा विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पहिल्या एससी स्टार अवार्ड 2022 कार्यक्रमात 1 मे रोजी होणार गौरव
Posted On:
03 APR 2022 2:25PM by PIB Mumbai
पणजी, 3 एप्रिल 2022
केंद्रीय बंदरे, नौवहन, जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ‘शेड्युल्ड कास्ट वेलफेअर असोसिएशन आणि रिबिल्ड इंडिया ट्रस्ट-गोवा’ यांच्या स्मरणिकेचे आज प्रकाशन करण्यात आले. संस्थेकडून अनुसूचित जातीतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पहिल्या गोवा ‘शेड्युल्ड कास्ट स्टार अवार्ड 2022’ पुरस्कारने 1 मे रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. काकुलो मॉल येथील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

श्रीपाद नाईक यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक आणि अभिनंदन केले. पुरस्काराच्या रुपाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरवल्यास इतरानांही त्यापासून प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले. अशाप्रकारच्या सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी दोन्ही संस्थांना शुभेच्छा दिल्या. समाजातील सर्वांनी मिळून मागास आणि वंचितांच्या कल्याणासाठी कार्य केले पाहिजे. समाजातील सर्वांचा विकास म्हणजे राज्याचा सर्वांगीण विकास होय, असे नाईक म्हणाले.
वैद्यकीय क्षेत्र, शिक्षक, अभियंता, उद्योजक, न्याय, शासकीय सेवा, कलाकार, माध्यमकर्मी, क्रीडा, सामाजिक कार्य, महिला या श्रेणीत 12 स्टार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1812943)
Visitor Counter : 228