आदिवासी विकास मंत्रालय

'परिक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या पाचव्या भागात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद


परिक्षा पे चर्चामध्ये यंदा जवळपास 350 एकलव्य आदर्श  निवासी शाळांमधील (EMRS)  75000 हून अधिक विद्यार्थी आणि  शिक्षक उपस्थित होते

Posted On: 01 APR 2022 10:25PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या पाचव्या भागात आगामी काळात येणाऱ्या परीक्षा या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात  इयत्ता 9वी ते 12वीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी  पंतप्रधानांशी मन:पूर्वक संवाद साधला.

पंतप्रधानांनी पालक आणि शिक्षकांच्या अपेक्षा, आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा यांसारख्या सर्व विषयांवरील प्रश्न ऐकून घेतले आणि या  प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना दिली. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात निराशा आणि तणावाचा सामना करण्याचा मंत्र, यशाचा मंत्र देतानाच  देशाला गौरव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे सांगितले. ,मुलगा-मुलगी भेदभाव  न करता दोघांनाही  शिक्षित करण्यावर पंतप्रधानांनी  भर दिला आणि शिक्षणाचे नवीन द्वार उघडणाऱ्या  आणि शिक्षणाची भाषा पुनर्परिभाषित करणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) संपूर्णपणे समजून घेण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

देशभरातील सुमारे 350 एकलव्य आदिवासी  निवासी शाळांचे (EMRS) 75000 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी या सत्रात भाग घेतला, त्यांची मते मांडली आणि पंतप्रधानांचे शैक्षणिक आणि तणावमुक्त परीक्षा देण्याचे तंत्र याविषयीचे अनुभवाचे बोल शांतचित्ताने  ऐकले.

तालकटोरा स्टेडियमवरील या कार्यक्रमाला ईएमआरएसचे आयुक्त .असित गोपाल उपस्थित होते.  तसेच मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी हे या कार्यक्रमाला दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते.

 

 

***

S.Kakade/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1812597) Visitor Counter : 178


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri