दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रशासन आणि व्यवस्थापन स्थायी समितीमध्ये भारताने मिळवले नेतृत्वाचे स्थान
भारतीय अधिकारी अपराजिता शर्मा यांची आंतरराष्ट्रीय संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
Posted On:
01 APR 2022 6:02PM by PIB Mumbai
भारताने आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रशासन आणि व्यवस्थापन परिषदेच्या स्थायी समितीमध्ये नेतृत्वाचे स्थान प्राप्त केले आहे. एका भारतीय अधिकाऱ्याची संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या समितीची 21 मार्च ते 31 मार्च 2022 या काळात जिनिव्हा इथे बैठक झाली. यात 1995 च्या तुकडीच्या आयपी अँड टीएएफ सेवा अधिकारी अपराजिता शर्मा यांची प्रशासन आणि व्यवस्थापन स्थायी समितीमध्ये उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
अपराजिता शर्मा, 2023 आणि 2024 वर्षांसाठी परिषदेच्या स्थायी समितीच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील तर 2025 आणि 2026 या वर्षांसाठी त्या अध्यक्ष असतील. त्या सध्या भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयात अर्थसंकल्प आणि सार्वजनिक उपक्रम वित्त विभागाच्या उपमहासंचालक (डीडीजी) पदावर कार्यरत आहेत.
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (आयटीयू) ही संयुक्त राष्ट्रांची माहिती आणि दूरसंवाद क्षेत्रातील विशेष तज्ञ संस्था आहे.
***
S.Kakade/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1812456)
Visitor Counter : 229