संरक्षण मंत्रालय
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची एचएएलकडून भारतीय हवाई दलासाठी (10) आणि लष्करासाठी (05) अशी 15 हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स (एलसीएच) मर्यादित शृंखला उत्पादनाच्या (एलएसपी) खरेदीला मंजुरी
प्रविष्टि तिथि:
30 MAR 2022 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली येथे 30 मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची (सीसीएस) बैठक झाली.या समितीने 377 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या मंजुरीसह 3,887 कोटी रुपये किंमतीच्या 15 हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स (एलसीएच) मर्यादित शृंखला उत्पादनाच्या खरेदीला मंजुरी दिली.
हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स (एलसीएच) मर्यादित शृंखला उत्पादन हे स्वदेशी बनावटीचे, विकसित आणि उत्पादित केलेले अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर आहे. यात सुमारे मूल्यानुसार 45% स्वदेशी सामग्री असून त्यात उत्तरोत्तर वाढ करून ती 55% पेक्षा जास्त करण्यात येईल.आवश्यक चपळाई , कुशलता, विस्तारित श्रेणी, अधिक उंचीवरील चोवीस तास कामगिरी, युद्धकाळात शोध आणि बचाव कार्याची (सीएसएआर) भूमिका पार पाडण्यासाठी सर्व हवामान स्थितीत लढाऊ क्षमता यांनी हे हेलिकॉप्टर सुसज्ज असून शत्रूच्या हवाई संरक्षणाचा नाश (डीईएडी), बंडखोरीविरोधातील मोहीम, संथ गतीने चालणारे विमान आणि दूरस्थ यंत्रणेद्वारे संचालित विमानाविरोधात (आरपीए),अधिक उंचीवरील शत्रूच्या चौक्या उध्वस्त करण्याची मोहीम, जंगल आणि शहरी भागातील बंडखोरी विरोधी अभियान यासह भूदलाला पाठबळ आणि भारतीय हवाई दल आणि भारतीय सैन्याच्या कार्यान्वयन गरजा पूर्ण करण्यासाठी हे हेलिकॉप्टर एक उत्तम साधन आहे.
कमी दृश्यमानता, आवाज, रडार आणि आय सिग्नेचर आणि विमान पाडण्याची पात्रता यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि गोपनीय वैशिष्ट्यांनी सुसज्ज प्रणाली या हेलिकॉप्टर्समध्ये असून आगामी 3 ते 4 दशकांमध्ये निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करणार्या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या तैनातीच्या दृष्टीने चांगली टिकावी या अनुषंगाने हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये मध्ये ही वैशिष्ट्ये एकत्रित केली आहेत. ग्लास कॉकपिट आणि कंपोझिट एअरफ्रेम स्ट्रक्चर यासारख्या अनेक महत्त्वाच्या विमान वाहतूक तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण करण्यात आले आहे. भविष्यातील शृंखला उत्पादन आवृत्तीमध्ये पुढील आधुनिक आणि स्वदेशी प्रणालींचा समावेश असेल.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1811699)
आगंतुक पटल : 319