वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) यांच्यातील सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी कराराचा (सीईपीए) मजकूर प्रकाशित

प्रविष्टि तिथि: 27 MAR 2022 9:51PM by PIB Mumbai

 

भारत सरकारचे  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री  पियूष गोयल यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्या दरम्यान आज आयोजित पत्रकार परिषदेत ,भारत आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) दरम्यान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या (सीईपीए) मजकुर प्रकाशित करत असल्याची  घोषणा केली.  दुबई येथे 28 मार्च 2022 आणि 29 मार्च 2022 रोजी होणाऱ्या अनुक्रमे  'इन्व्हेस्टोपिया समिट' आणि 'वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट' मध्ये सहभागी होण्यासाठी गोयल संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत.आज झालेल्या अनावरणानंतर, भारत आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) दरम्यान सर्वसमावेशक  वित्तीय  भागीदारी कराराचा  मजकूर आता सार्वजनिक मंचावर  उपलब्ध झाला आहे.

18 फेब्रुवारी 2022 रोजी नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान महामहिम नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे युवराज आणि संयुक्त अरब अमिरातीच्य सशस्त्र दलांचे उप सर्वोच्च कमांडर आणि कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन ज़ायेद अल नहान यांच्यात झालेल्या आभासी शिखर परिषदेदरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करारासाठी भारत-संयुक्त अरब अमिराती दरम्यानच्या  वाटाघाटी 88 दिवसांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण झाल्या.

हा करार 01 मे 2022 रोजी अंमलात येण्याची अपेक्षा आहे.

***

S.Kane/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1810312) आगंतुक पटल : 375
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी