संरक्षण मंत्रालय

राष्ट्रपतींनी आयएनएस वलसुराला राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट्स कलर) देऊन गौरवले

Posted On: 25 MAR 2022 7:58PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 25 मार्च 2022 रोजी आयएनएस वलसुराला प्रतिष्ठित राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट्स कलर)  प्रदान केला. 'निशान अधिकारी' लेफ्टनंट अरुण सिंग संब्याल यांनी दिमाखदार संचलनात राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट्स कलर) स्वीकारला. यावेळी  राष्ट्रपतींना 150 जणांच्या तुकडीने मानवंदना दिली. आयएनएस वलसुराचे 800 हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नौदलाच्या बँडच्या  तालावर  संचलन केले.

गुजरातचे  राज्यपाल  आचार्य देवव्रत, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार, व्हाईस अॅडमिरल एमए हम्पीहोली, सदर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ,  आणि इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी  या वेळी उपस्थित होते.

शांतता आणि युद्धाच्या काळात  राष्ट्रासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेच्या सन्मानार्थ लष्करी तुकडीला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला जातो. 27 मे 1951 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती ध्वज प्रदान करून  सन्मानित केलेले भारतीय नौदल हे पहिले भारतीय सशस्त्र दल होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1942 मध्ये  भारतीय नौदलाची लढाऊ ताकद  वाढवण्यासाठी  प्रगत टॉर्पेडो प्रशिक्षण सुविधा निर्माण करणे गरजेचे  होते, तेव्हा आयएनएस वलसुराला नौदलाच्या सेवेत सामील करून  घेण्यात आले होते.  भारत प्रजासत्ताक बनल्यानंतर, 1 जुलै  1950 रोजी तुकडीचे  नाव बदलून आयएनएस वलसुरा असे करण्यात आले. त्यानंतर, आयएनएस वलसुराने स्वतःमध्ये परिवर्तन घडवून  व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरणाच्या योजनांनुसार उत्तम  प्रगती केली आहे. सौराष्ट्रमध्ये सामाजिक उपक्रमाचा  भाग म्हणून, आयएनएस वलसुराने अनेक कल्याणकारी उपाययोजना  केल्या आहेत.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1809837) Visitor Counter : 186


Read this release in: English , Urdu , Hindi