नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी विमान वाहतुकीशी संबंधित आशियातील सर्वात मोठा कार्यक्रम विंग्ज इंडिया 2022 चा हैदराबादच्या बेगमपेट विमानतळ येथे प्रारंभ
Posted On:
24 MAR 2022 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2022
नागरी विमान वाहतुकीशी संबंधित आशियातील सर्वात मोठा कार्यक्रम विंग्ज इंडिया 2022 चा आज हैदराबादच्या बेगमपेट विमानतळ येथे प्रारंभ झाला. भारतीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MoCA) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची यावर्षीची संकल्पना "इंडिया @75: विमान वाहतूक उद्योगासाठी नव्या संधी’ अशी आहे. विंग्स इंडिया हा द्वैवार्षिक शो 24 ते 27 मार्च 2022 या कालावधीत आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये पहिले दोन दिवस उद्योगांसाठी राखीव आहेत आणि उर्वरित दिवस सामान्य लोकांसाठी खुले आहेत. शुक्रवार, 25 मार्च 2022 रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन होईल.

कार्यक्रमात प्रदर्शन, परिषद, चॅलेट्स, सीईओ फोरम, स्टॅटिक डिस्प्ले, पत्रकार परिषद आणि पुरस्कार वितरण यांचा समावेश आहे. धोरणात्मक मुद्दे आणि व्यावसायिक पैलूंवर केंद्रित नागरी विमान वाहतूक क्षेत्रावरील परिषद त्याच वेळी आयोजित केली जात आहे.

प्रदर्शनात भाग घेणार्या प्रदर्शकांमध्ये विमान आणि हेलिकॉप्टर उत्पादक, एअरक्राफ्ट इंटिरियर्स, विमाने आणि उपकरणे निर्मिती कंपन्या, विमानतळ पायाभूत विकास कंपन्या, ड्रोन, कौशल्य विकास, अंतराळ उद्योग, विमान कंपन्या , विमान सेवा आणि कार्गो यांचा समावेश आहे. 11 हॉस्पिटॅलिटी चॅलेट्ससह 125 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रदर्शक या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. 15 हून अधिक देश आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची शिष्टमंडळेही आहेत. या जागतिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातील विमान वाहतूक मंत्री आणि उद्योगपतीं एकत्र येत आहेत.

आज पहिल्या दिवशी हेलिकॉप्टर उद्योग, व्यावसायिक विमान वाहतूक आणि कृषी उडान या विषयांवर अनेक गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील विविध आकर्षणांमध्ये भारतीय वायुसेनेच्या सारंग पथकाच्या हेलिकॉप्टर एरोबॅटिक कवायती देखील आहेत. यावेळी आकर्षक रंगातल्या Mk- I प्रगत लढाऊ हेलिकॉप्टर्सनी अवकाशात झेपावत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1809402)
Visitor Counter : 264