दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टपाल विभागाच्या गोवा कार्यालयाकडून "मायरिस्टिका स्वॅम्प्स- अनोखी परिसंस्था"यावर एका विशेष कव्हरचे आणि विशेष कॅन्सलेशन स्टॅंपचे प्रकाशन

Posted On: 21 MAR 2022 6:53PM by PIB Mumbai

पणजी, 21 मार्च 2022

टपाल विभागाच्या गोवा कार्यालयाने गोवा वन विभागाच्या सहकार्याने वनभवन, आल्टिन्हो-पणजी, येथे मायरिस्टिका स्वॅम्प्स-एक अनोखी परिसंस्था यावर एका विशेष कव्हर आणि कॅन्सलेशन स्टॅंपचे प्रकाशन केले. लोलियेम  सब पोस्ट ऑफिससाठी ऑलिव्ह रिडले टर्टल वरील ऑगमेंटेड रिॲलिटीसह कायमस्वरूपी चित्रमय पोस्टकार्ड संचसह, महाराष्ट्र आणि गोव्यातील बिबट्या आणि पक्षी विविधता, या विषयावरील चित्रांच्या पोस्टकार्डांचा संच  या दोन्ही ऑगमेंटेड रिॲलिटीसह पोस्टकार्डच्या दोन्ही संचांचे यावेळी प्रकाशन झाले.

या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे प्रमुख वनसंरक्षक,भारतीय वनसेवा अधिकारी श्री.  राजीव कुमार गुप्ता,( IFS), आणि आणि पणजीतील पोस्टमास्टर जनरल, ‌‌कर्नल एस एफ एच रिझवी (गोवा क्षेत्र) पणजी, हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.  21 मार्च 2022 रोजी आंतरराष्ट्रीय वन दिनाच्या स्मरणार्थ हे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी जॉगर्स पार्क, आल्टिन्हो पणजी येथे वृक्षारोपण समारंभ साजरा झाला.भारतीय वनसेवा अधिकारी, प्रमुख वनसंरक्षक, गोवा,श्री.  राजीव कुमार गुप्ता,(IFS), प्रधान पोस्टमास्टर जनरल, पणजी, ‌‌कर्नल एस एफ एच रिझवी (गोवा क्षेत्र) पणजी, भारतीय वनसेवा अधिकारी,अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य वन्यजीव संरक्षक श्री.  संतोष कुमार, (IFS,) यांच्यासह इतर मान्यवर यावेळी झालेल्या वृक्षारोपणात सहभागी झाले होते.

 

 

 

 

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1807800) Visitor Counter : 198


Read this release in: English