गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

घरबांधणी व शहर विकास मंत्रालयाने घोषित केले इट-स्मार्ट सिटीज चॅलेंजमधील विजेते

Posted On: 16 MAR 2022 10:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मार्च 2022

इट स्मार्ट शहरे स्पर्धे अंतर्गत निवडलेल्या अकरा शहरांच्या नावांची घोषणा घर बांधणी आणि शहर विकास मंत्रालयाने आज केली. या शहरांना आता स्पर्धेच्या वरच्या स्तरावरील आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यांच्यामधील प्राथमिक टप्प्यातील प्रकल्प शाश्वततेच्या मोजमापानुसार क्रमवारी ठरणार आहे. भारतीय   अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या सहकार्याने गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने 15 एप्रिल 2021 रोजी शहरांसाठी खाण्याच्या योग्य पद्धती बिंबवण्याच्या दृष्टीने इट राईट हे लक्ष्य ठेवण्यासाठी आव्हानात्मक  स्पर्धा जाहीर केल्या होत्या. दूरदृश्य पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेल्या घरबांधणी आणि शहरे विकास मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी यांनी सुरुवातीच्या टप्प्यातील विजयी शहरांची घोषणा केली.  FSSAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या स्पर्धेला सहयोग देणाऱ्या सहभागी संस्थांचे जागतिक आणि भारतीय अधिकारी तसेच मूल्यांकन करणाऱ्या मिलन अर्बन फूड पॉलिसी पॅक्ट (MUFPP), द फूड फाउंडेशन, युके तसेच विजेत्या शहरांचे प्रतिनिधी, केंद्रीय आणि राज्य सरकारांमधील अधिकारी आणि 100 स्मार्ट शहरांचे महापालिका आयुक्त व  मुख्य कार्यकारी  अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

स्मार्ट शहरांच्या स्पर्धेच्या निमित्ताने  इट राईट इंडिया ही भूमिका आता शहरांच्या पातळीवर राबवली जाणे ही  अभिमानाची गोष्ट आहे असे मनोज जोशी या वेळी बोलताना म्हणाले.

ग्राहकांमध्ये जागृती करण्याच्या तसेच त्यांना चांगल्या अन्नाची निवड करता यावी म्हणून या अकरा शहरांमध्ये सर्व शहरांना त्यांच्या अन्नपद्धतीत बदल करण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने तसंच अन्न सुरक्षा व नियमनाधारित वातावरण निर्मितीसाठी चळवळ सुरू होईल अशी आमची अपेक्षा आहे, असेही त्यांनी नमूद केले. हे सर्व स्थानिक पातळीवर होण्याच्या हेतून आम्ही स्थानिक संस्थांना यात अंतर्भूत केले. आता ग्राहकांना चविष्ट व आरोग्यपूर्ण अन्न किफायतशीर दरात मिळावे म्हणून नियमन आणि परवानापत्राशी संबधित बाबींची छाननी गरजेची आहे. शाळा कॉलेज वा कार्यालयातील खानपानगृहात तसेच अधिकृत बैठकांमध्ये चांगले व सुरक्षित अन्नच उपलब्ध व्हावे याकडेही लक्ष पुरवणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

 

 

 

 

 

S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1806786) Visitor Counter : 190


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia