अर्थ मंत्रालय
psbloansin59minutes.com या पोर्टलच्या माध्यमातून 39,580 कोटी रुपयांच्या व्यवसाय कर्जाचे 2,01,863 प्रस्ताव मंजूर
या पोर्टलच्या माध्यमातून किरकोळ कर्ज श्रेणीतील 1,689 कोटी रुपयांचे 17,791 प्रस्ताव मंजूर
Posted On:
15 MAR 2022 6:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2022
psbloansin59minutes.com या पोर्टलच्या कामकाजाची सुरुवात 25 सप्टेंबर 2018 रोजी झाली. तेव्हापासून 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत व्यावसायिक कर्ज श्रेणीतील 39,580 कोटी रुपयांच्या कर्जाचे 2,01,863 प्रस्ताव तसेच किरकोळ कर्ज श्रेणीतील 1,689 कोटी रुपयांचे 17,791 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत किसनराव कराड यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, या पोर्टलचा वापर करणाऱ्या आणि कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना कर्जदात्यांकडून तात्विकदृष्ट्या अधिक जलद कर्जमंजुरीसाठी मंच उपलब्ध करून दिला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या कर्जप्रस्तावांवरील अंतिम निर्णय कर्जदाता घेतो आणि कर्ज घेण्यास इच्छुक व्यक्तींना कळविण्यात येतो आणि अनुत्पादक मालमत्ता म्हणून वर्ग करता येऊ शकणाऱ्या कोणत्याही खात्यातून कर्ज वसुली पावलांसह मंजूर कर्जाच्या खात्यावर लक्ष ठेवण्याचे काम देखील कर्ज देणाऱ्या संस्थांकडेच असते. या सर्व खात्यांचे तपशील केंद्रीय पद्धतीने ठेवले जात नाहीत.
कर्जाच्या एकूण प्रक्रियेबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, कर्ज मंजुरी आणि नंतरची प्रक्रिया कर्ज देणाऱ्या संस्थांच्या संबंधित शाखा आणि कर्ज प्रक्रिया केंद्रांकडून केली जाते. ते पुढे म्हणाले की, अनेक वित्तपुरवठादार संस्था कर्ज घेणाऱ्यांच्या किरकोळ, सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग, इत्यादींसारख्या विविध घटकांशी त्यांच्या विशिष्ट उद्योगाशी संबंधित कर्जविषयक गरजा लक्षात घेऊन psbloansin59minutes.com, paisabazaar.com, क्रेडअॅव्हेन्यू, ट्रेडरेसिव्हेबल्स डिस्काऊंटिंगसिस्टिम मंच इत्यादींसारख्या डिजिटल कर्ज बाजारांशी जोडून घेऊन किंवा त्यांच्या प्रणालीत सहभागी होतात. अशा वित्तपुरवठादार संस्था त्यांच्या अंतर्गत मंजुरी प्रक्रियेसह अशा प्रकारच्या कर्जाच्या बाजारांशी संबंधित मंचांच्या माध्यमातून काम करतात असे त्यांनी सांगितले.
कर्ज खात्यांची संख्या आणि मंजूर झालेल्या कर्जाच्या रकमेचे राज्य-निहाय तपशील परिशिष्टात दिले आहेत.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1806275)
Visitor Counter : 181