पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी संयुक्तपणे वनीकरणाच्या माध्यमातून 13 प्रमुख नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल केला जारी
Posted On:
14 MAR 2022 9:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2022
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि पर्यावरण,वने व हवामान बदल खात्याचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी संयुक्तपणे वनीकरणाच्या माध्यमातून तेरा प्रमुख नद्यांच्या पुनरुज्जीवनावर विस्तृत प्रकल्प अहवाल (DPRs) जारी केला. विस्तृत प्रकल्प अहवाल जारी करण्यात आलेल्या 13 नद्यांमध्ये झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, यमुना, ब्रह्मपुत्रा, लुनी, नर्मदा, गोदावरी, महानदी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांचा समावेश आहे. डीपीआरसाठी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय वनीकरण आणि पर्यावरण विकास मंडळाने निधी दिला आणि देहरादून येथील भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषदेने (ICFRE) तो तयार केला.
आपण नद्यांना काय परत द्यायचे याचा विचार करणे जेव्हा आपण सोडून दिले, तेव्हापासून आपण विकासाची गरज आणि पर्यावरणीय शाश्वततेचा समतोल यापासून दुरावले गेलो,असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या कार्यक्रमात सांगितले. जेव्हा आपण निसर्गाचे संरक्षक होणे सोडून दिले आणि त्याऐवजी आपण त्यावर आपली मालकी लादली, तेव्हापासून आपण शोषण सुरू केले आणि संसाधनांचे अधिक शोषण करू लागलो,असे ते म्हणाले.
या डीपीआरच्या सहाय्याने, सर्वसमावेशक नियोजनाद्वारे, आम्ही एकात्मिक व्यवस्थापन आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे भविष्यासाठी एक चांगला संसाधन पाया रचण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो,असा विश्वास शेखावत यांनी व्यक्त केला.
या मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, विस्तृत प्रकल्प अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी 25 वर्षांचा काळ 'अमृत काल' करण्याच्या समग्र संकल्पनेशी सुसंगत आहेत. आगामी 10 - 20 वर्षांसाठीचे वनीकरणाचे लक्ष्य डीपीआर निर्धारित करतील. त्यानंतर भावी पिढ्यांना सध्याच्या पिढीच्या 'वन भागीदारी आणि जन भागीदारी'द्वारे 'हरित भारत' मिळेल.
13 प्रमुख भारतीय नद्यांच्या डीपीआरमधील संकल्पनेनुसार प्रस्तावित वनीकरण हस्तक्षेपांची वेळेवर आणि प्रभावी अंमलबजावणी केल्याने भू आणि जलचर जैवता व उपजीविका सुधारण्यात आणि स्वच्छ किनाऱ्यांसोबत, अविरल धारा, निर्मल धारा या संदर्भात नद्यांचे पुनरुज्जीवन यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान अपेक्षित आहे.
S.Kane/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805976)
Visitor Counter : 274