आदिवासी विकास मंत्रालय
ट्राईब्स इंडिया उत्पादनांनी आपल्या जीवनाबरोबरच आपल्या आदिवासी बंधू-भगिनींच्या जीवनातही सौंदर्य फुलवले आहे – प्रादेशिक व्यवस्थापक, ट्रायफेड महाराष्ट्र
होळीसाठी आपण अजून रंगांची खरेदी केली नसाल तर लक्षात घ्या ट्राईब्स इंडिया हर्बल गुलाल !
Posted On:
14 MAR 2022 6:21PM by PIB Mumbai
मुंबई, 14 मार्च 2022
ट्राईब्स इंडिया उत्पादने आपल्या जीवनात आणि घरांमध्ये सौंदर्य फुलवण्याबरोबरच आपल्या आदिवासी बंधू-भगिनींच्या उत्पन्नात भर घालत त्यांच्या जीवनातही लक्षणीय योगदान देत असल्याचे ट्रायफेड महाराष्ट्रचे प्रादेशिक व्यवस्थापक मयूर गुप्ता यांनी म्हटले आहे. ट्राईब्स इंडियाच्या होळी सेल कलेक्शनचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1805065

महाराष्ट्रातल्या खालील पाच दुकानांना 31 मार्च 2022 पर्यंत सातही दिवस सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत जनता भेट देऊ शकते अशी माहिती प्रादेशिक व्यवस्थापकांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी हस्तकला शोरूम
- ट्राईब्स इंडिया एलआयसी बिल्डींग फोर्ट,इंडियन ग्लोब चेंबर्स, तळमजला,डॉ दादाभाई नौरोजी मार्ग,बलार्ड इस्टेट, फोर्ट, महाराष्ट्र-400001, संपर्क क्रमांक -9819148900.
- ट्राईब्स इंडिया जुहू, एचपी पेट्रोल पंप, एक्सेल सर्व्हिस स्टेशन, यमुना नगर, विमानतळ क्षेत्र, विलेपार्ले (पश्चिम), जुहू, मुंबई, महाराष्ट्र - 400049. संपर्क क्रमांक - 7208416551.
- ट्राइब्स इंडिया पनवेल / प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र, प्लॉट नंबर 3, ट्रायफेड टॉवर, सेक्टर 17, खांदा कॉलनी, पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र - 410206. संपर्क क्रमांक - 9665156474.
- ट्राइब्स इंडिया पुणे, बीएआयएफ इमारत , तळमजला, कामधेनू, सेनापती बापट मार्ग , बँक ऑफ बडोदा जवळ, जवाहर नगर, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र 411016. संपर्क क्रमांक – 9702399468
- ट्राइब्स इंडिया पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, डिपार्चर गेट नंबर – 2, लोहगाव, पुणे महाराष्ट्र – 411032. संपर्क क्रमांक – 7757008613.
ट्राइब्स इंडियाच्या होळी कलेक्शन मध्ये उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असल्याची माहिती देत यामध्ये हर्बल गुलाल,पारंपरिक कुडते, उत्फुल्ल रंगाच्या साड्या,देशभरातल्या आदिवासी बांधवानी हाताने केलेल्या वस्तू समावेश आहे. आपल्या दैनंदिन गरजांसाठी ट्राइब्स इंडिया एकाच ठिकाणी सर्व उत्पादने पुरवते.

भारत आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असतानाच्या या होळीसाठी आपल्या जवळच्या ट्राइब्स इंडियाच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांसाठी शोरूमला अवश्य भेट द्या आणि रंग आणि स्नेह यांचा हा उत्सव साजरा करा असे आवाहन त्यांनी केले आहे.

S.Kane/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805897)
Visitor Counter : 211