संरक्षण मंत्रालय
भारत-चीन कॉर्प्स कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या 15 व्या फेरीतील बैठकीनंतरचे संयुक्त प्रसिद्धीपत्रक
Posted On:
12 MAR 2022 7:52PM by PIB Mumbai
भारत-चीन कॉर्प्स कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीची 15 वी फेरी 11 मार्च 2022 रोजी चुशूल-मोलदो सीमेवरील भारतीय बाजूला असलेल्या भेटण्याच्या स्थानी पार पडली. पश्चिम क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या परिसराशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी या आधी 12 जानेवारी 2022 रोजी झालेल्या फेरीतील चर्चा दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी पुढे सुरु ठेवली. या विषयाबाबत उर्वरित समस्या लवकरात लवकर सोडविण्याच्या उद्देशाने चर्चा करण्याबाबत दोन्ही देशांच्या नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसारच या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी विचारांचे तपशीलवार आदानप्रदान केले.
अशा प्रकारे चर्चेतून समस्या सोडविल्यामुळे पश्चिम क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागात शांतता आणि स्थैर्य पुनःप्रस्थापित होईल आणि त्यातून द्विपक्षीय संबंधामध्ये प्रगती करणे सुलभ होईल असा विश्वास दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पश्चिमी क्षेत्राच्या भूभागावर अंतरिम सुरक्षा आणि स्थैर्य राखण्याबाबत देखील दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी बैठकीच्या शेवटी सहमती दर्शविली. विवादित भागातील उर्वरित समस्या सोडविण्यासाठी परस्परांना मान्य होईल अशा पर्यायापर्यंत पोहोचण्यासाठी लष्करी आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या मार्गाने चर्चा सुरु ठेवण्याला दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी संमती दिली.
***
R.Aghor/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805392)