श्रम आणि रोजगार मंत्रालय
आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत प्रेरणादायी सप्ताहाचा भाग म्हणून श्रम आणि रोजगार मंत्रालयातर्फे कामगार कायद्यांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
11 MAR 2022 5:49PM by PIB Mumbai
मुंबई, 11 मार्च 2022
श्रम आणि रोजगार मंत्रालयातर्फे मुंबईत सीएसटी मेट्रो स्टेशन येथील हिंदुस्तान बांधकाम कंपनी (HCC) च्या बांधकामस्थळावर काल 10 मार्च 2022 रोजी कामगार आणि मालकवर्गासाठी कामगार कायद्यांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजादी का अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत प्रेरणादायी सप्ताहाचा भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन 7 ते 13 मार्च या दरम्यान करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे आणि मध्य़ रेल्वेचे मुख्य कार्मिक अधिकारी के के ठाकूर यांनी या कायद्यांचा वापर राष्ट्राच्या विकासासाठी कशा प्रकारे सहाय्यभूत होईल यावर विवेचन केले.

मुख्य कामगार उपायुक्त (मुख्य), मुंबई तेजबहादुर यांनी कामगार आणि मालकांच्या प्राथमिक कर्तव्ये आणि हक्क याबद्दल माहिती देऊन कायद्याचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
मुंबईच्या सहाय्यक कामगार आयुक्त (मुख्य) श्रद्धा श्रीवास्तव यांनी कामगार कायद्यांमधील तरतूदी तसेच त्याच्या अंमलबजावणीचे किंवा तो न लागू करण्याचे परिणाम याबाबत सांगितले.

मुंबईच्या सहाय्यक कामगार आयुक्त (मुख्य) करुणा श्रीबाद आणि कामगार अंमलबजावणी अधिकारी (मुख्य) सोनू बुरा यांचाही कार्यक्रमात सहभाग होता.

कामगार कायद्यांविषयी कामगारांमध्ये जागृती करण्यासाठी पत्रकेही वाटण्यात आली.
मुख्य कामगार उपायुक्त (मुख्य), मुंबई कार्यालयाने या उपक्रम मालिकेत अणुउर्जा महामंडळ मर्यादित येथे 9 मार्च 2022 रोजी तसेच कोकण रेल्वे, बेलापूर इथे 8 मार्च 2022 रोजी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते. अणुउर्जा महामंडळचे स्थळ निदेशक प्रमुख वी के शर्मा आणि अर्थिक विभागाचे प्रमुख राजेश भडांगे यांची या कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून उपस्थिती होती.
S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805121)
Visitor Counter : 178