भारतीय स्पर्धा आयोग
स्पर्धा कायद्याचे अर्थशास्त्र याविषयावर राष्ट्रीय परिषद
Posted On:
04 MAR 2022 8:27PM by PIB Mumbai
भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) आज आभासी माध्यमातून, स्पर्धा कायद्याचे अर्थशास्त्र या विषयावर सातवी राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य नीलकंठ मिश्रा या परिषदेत प्रमुख वक्ते होते.या परिषदेच्या उद्घाटन सत्रात भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष अशोक कुमार गुप्ता यांचे विशेष भाषण झाले.आणि भारतीय स्पर्धा आयोगाच्या सदस्य डॉ. संगीता वर्मा यांच्या उद्घाटनपर भाषणाने परिषदेची सुरुवात झाली. नीलकंठ मिश्रा यांच्या प्रमुख भाषणात , प्रचंड प्रमाणात तंत्रज्ञानाचा उदय तसेच नियमन आणि नियामकांसाठी आव्हाने आणि नवे प्रश्न यावर भर होता. डिजिटल बाजारात बाजार शक्तीच्या मूल्यवर्धनाला चालना देणाऱ्या नेटवर्क प्रभाव, बचतीच्या दृष्टीने उत्पादन कार्यक्षम करून खर्च कमी करणारी स्केल इकॉनॉमी, तंत्रज्ञान संबंधित व्यवस्थेमधील भौतिक स्वरूपात नसलेल्या अमूर्त मालमत्तेमधील समन्वय इत्यादीसारख्या प्रमुख तांत्रिक आणि आर्थिक घटकांवर मिश्रा यांनी भाष्य केले.
स्पर्धेची स्थिती आणि मदत, प्रोत्साहन किंवा अडथळे समजून घेत बाजारातील गुंतागुंत उलगडण्यात अर्थशास्त्राची भूमिका अशोक कुमार गुप्ता यांनी आपल्या विशेष भाषणात स्पष्ट केली. या परिषदेत दोन तांत्रिक सत्रेही झाली.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1803045)
Visitor Counter : 276