नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

स्वेच्छा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टने दिला सन्मानपूर्वक निरोप


अथक सेवेबद्दल जेएनपीटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे मानले आभार

Posted On: 04 MAR 2022 7:18PM by PIB Mumbai

 

मुंबई, 04 मार्च, 2022

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) या भारतातील प्रमुख कंटेनर बंदर प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्वेच्छा निवृत्ती योजना (एसव्हीआरएस) 2021  योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 28 फेब्रुवारी 2022 रोजी जेएनपीटीचे 460 कर्मचारी स्वेच्छेने निवृत्त झाले.

विशेष स्वेच्छा निवृत्ती स्वीकारलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जेएनपीटी प्रशासनाने 21, 22, 23 आणि 28 फेब्रुवारी असे चार दिवस निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, "कर्मचार्‍यांच्या अथक कार्याबद्दल जेएनपीटी प्रशासन सदैव आभारी राहील. जेएनपीटीने आजवर जी प्रगती केली आहे ती कर्मचार्‍यांच्या समर्पित कार्यामुळेच शक्य झाली आहे. जेएनपीटीच्या विस्तारामध्ये व विकासामध्ये कर्मचार्‍यांनी दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील तसेच भविष्यातही सर्व सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकारी नेहमी जेएनपीटी परिवाराचा एक भाग असतील."

जेएनपीटी प्रशासनाने स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या कर्मचार्‍यांसाठी 28 फेब्रवारी रोजी आयोजित केलेल्या विशेष निरोप समारंभाच्या शेवटच्या सत्रामध्ये जेएनपीटीचे उपाध्यक्ष श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. उपस्थित होते. निरोप समारंभात कर्मचार्‍यांना संबोधित करताना श्री वाघ म्हणाले, सेवानिवृत्त होणारे सर्व कर्मचारी व अधिकारी हे जेएनपीटीचे राजदूत आहेत आणि जेएनपीटी सदैव तुमच्या पाठीशी असेल. जेएनपीटीचे कामगार विश्वस्त, सर्व विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, जेएनपीटी कर्मचारी व कुटुंबीयांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष श्री वाघ यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

विशेष स्वेच्छा सेवानिवृत्ति योजनेंतर्गत सेवानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निधि खात्यातील शिल्लक, जमा झालेल्या रजांच्या समतुल्य रोख रक्कम, ग्रॅच्युइटी, पेन्शन, कम्युटेशन आणि सर्व काही वैद्यकीय लाभांसह अनुग्रह राशीचे आकर्षक व सर्वसमावेशक पॅकेज देण्यात आले.

***

JNPT/S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1803019) Visitor Counter : 220


Read this release in: English