भारतीय स्पर्धा आयोग
स्पर्धा कायद्याचे अर्थशास्त्र यावर भारतीय स्पर्धा आयोगाकडून 4 मार्चला दृकश्राव्य माध्यमाद्वारे सातवी राष्ट्रीय परिषद आयोजित
Posted On:
01 MAR 2022 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मार्च 2022
भारतीय स्पर्धा आयोग (CCI) शुक्रवार, दिनांक 4 मार्च, 2022 रोजी स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावरील 7वी राष्ट्रीय परिषद दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित करत आहे. 2016 पासून दरवर्षी सीसीआय या परिषदेचे आयोजन करत आहे.
या परिषदेत सकाळी 10:00 वाजता होणाऱ्या उद्घाटन सत्रात पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य नीलकंठ मिश्रा बीजभाषण देतील. परिषदेत एक पूर्ण सत्र आणि दोन तांत्रिक सत्रे असतील. या वर्षीच्या परिषदेतील पूर्ण सत्र, ‘बाजारपेठांमधील सुधारणा आणि व्यापकता’ या विषयावर आहे. परिषदेत चर्चेसाठीची विषयसूची संदर्भासाठी जोडली आहे.
स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रामध्ये स्वारस्य विकसित करण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा आणि अर्थतज्ञांचा वैचारीक समूह तयार करण्याचा ही परिषद प्रयत्न करत आहे. यामुळे स्पर्धाकायद्याच्या अर्थशास्त्राच्या क्षेत्रात काम करणारे विद्वान, अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ञ यांना ही परीषद एकत्र आणेल.
स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावरील 7 व्या राष्ट्रीय परिषदेची सर्व सत्रे दृकश्राव्य माध्यमाद्वारे पहाण्यासाठी माध्यमाकरिता खुली आहेत.
माध्यमातील व्यक्तींनी परिषदेची वेबलिंक मिळवण्यासाठी दिनांक 2 मार्च 2022 पर्यंत येथे नोंदणी करावी:
(https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfbb0wBYPF9QajNegQlYTsI8XI123MfuugTCwKshpIBe2jUSw/viewform)
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1802091)
Visitor Counter : 240