परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा विभागीय पारपत्र कार्यालयाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 21 FEB 2022 4:02PM by PIB Mumbai

पणजी, 21 फेब्रुवारी 2022

 

केंद्र सरकारने सांस्कृतिक मंत्रालयावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी नोडल मंत्रालय म्हणून जबाबदारी निश्चित केली आहे. तर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासाठी 21-27 फेब्रुवारी हा आठवडा निश्चित केला आहे. याचाच भाग म्हणून आज गोवा विभागीय पारपत्र कार्यालयाने गोवा विद्यापीठ आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्याच्या लढ्यावर व्याख्यान आणि प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रो. व्ही एस नाडकर्णी, सहायक पारपत्र अधिकारी संजीव संगर आणि आयसीसीआरचे राकेश कुमार यांची उपस्थिती होती.

गेल्या 75 वर्षांत देशाने अंतर्गत आणि जागतिक अर्थव्यवस्थेत आणि राजकीय आघाडीवर मोठी झेप घेतल्याचे प्रतिपादन व्ही एस नाडकर्णी यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमातून परदेशातून भारतात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना देशवासियांबरोबरच इतिहासाचे ज्ञान होईल, असे ते म्हणाले. सहायक पारपत्र अधिकारी संजीव संगर यांनी पारपत्र कार्यालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यात नागरिकांसाठी पासपोर्ट जागृती कार्यक्रमावर भर देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

दुसऱ्या सत्रात डॉ दत्तेश परुळेकर यांनी ‘स्वातंत्र्याची 75 वर्षे’ या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यलढ्यावर आधारीत प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेला भरभरुन प्रतिसाद दिला. विजेत्यांना आणि सहभागितांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

  

* * *

PIB Goa| VK/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1800051) आगंतुक पटल : 233
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English