पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
विकसित राष्ट्रांची अशाश्वत जीवनशैली आजही संपूर्ण जगासाठी धोकादायक : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव
Posted On:
16 FEB 2022 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2022
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 16 फेब्रुवारी 2022 रोजी 21 व्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात विशेष भाषण दिले. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद ही द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (TERI) चा वार्षिक प्रमुख कार्यक्रम आहे.
"हवामान बदलासह जागतिक पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, आपण आता समता आणि समानता तत्वे मात्र भिन्न जबाबदाऱ्या आणि संबंधित क्षमता विचारात घेऊन जागतिक स्तरावर मान्य नियमांच्या आधारे कृती केली पाहिजे. पॅरिस कराराची उद्दिष्टे तोवर गाठता येणार नाहीत जोपर्यंत सर्व देश जागतिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यात समान योगदान देत नाहीत . समान शाश्वत विकास आणि हवामान कृतींमध्ये समानता हे आपले ध्येय असायला हवे. तरच ‘हवामान न्याय’ साध्य होऊ शकेल.
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798904)
Visitor Counter : 194