दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

मुंबई विभागासाठी पोस्टल पेन्शन अदालत

Posted On: 15 FEB 2022 8:10PM by PIB Mumbai

मुंबई, 15 फेब्रुवारी 2022

मुंबईतल्या टपाल कार्यालयात काम करून निवृत्त झालेल्या किंवा मुंबई विभागातील कार्यालयातून पेन्शन घेणारे टपाल विभागाचे पेन्शनधारक/फॅमिली पेन्शनधारक यांच्यासाठी मुंबई विभागाचे पोस्टमास्तर जनरल पेन्शन अदालत आयोजित करणार आहेत. 1 मार्च 2022 रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्तर जनरल कार्यालय, मुंबई विभाग, मुंबई जीपीओ इमारत- मुंबई-400001 येथे ही अदालत आयोजित होणार आहे.

यासाठी निवृत्तीवेतनधारक वरिष्ठ लेखापरीक्षण अधिकारी, पोस्टमास्तर जनरल कार्यालय, मुंबई विभाग, जीपीओ बिल्डिंग, मुंबई- 400001 येथे 25 फेब्रुवारी रोजी 2022 किंवा त्यापूर्वी अर्ज पाठवू शकतात.

त्यासाठी खाली दिलेल्या नमुन्यात अर्ज करायचा आहे. 25 फेब्रुवारी, 2022 नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेन्शन अदालतसाठी विचार करता येणार नाही. कायदेविषयक मुद्दे, पॉलिसीविषयक मुद्दे असलेल्या तक्रारी यांचा विचार पेन्शन अदालत मध्ये करण्यात येणार नाही. अर्जाचा नमुना खालील प्रमाणे आहे.

Sr No.

subiect

Details to be filled in by the Pensioner/Family Pensioner

1.

Name of the Pensioners/Family Pensioner with designation at the time of retirement/death.

 

2.

Name of Post office/ other Departmental office from where retired etc. and date of retirement.

 

3.

PPO No. Of Pensioner/Family Pensioner.

 

4.

Name of Post Office/Head Post Office/Bank from where Pension/Family Pension is being drawn.

 

5.

Postal address of the pensioner/Family Pensioner with phone no.

 

6.

Complaints in brief (Attach application containing details if required)

 

7.

Date & Signature of the Pensioner/ Family Pensioner. 

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1798602) Visitor Counter : 153


Read this release in: English