आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिव्यांगांसाठी श्रवणक्षमतामापन प्रयोगशाळा

Posted On: 11 FEB 2022 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) च्या छत्र योजनेअंतर्गत, भारत सरकार बहिरेपणा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (NPPCD) लागू करते ज्यामध्ये राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या एकूण संसाधनानुसार त्यांच्या कार्यक्रम अंमलबजावणी योजनेच्या (PIPs) आवश्यकतेनुसार मागणी केलेले आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्यासाठी प्रदान केले जाते.

NPPCD च्या कार्यक्रम मार्गदर्शक तत्त्वांनुसार, उपकरणे आणि श्रवणयंत्र साधनांसाठी सहाय्य प्रदान करून कानाची देखभाल करणाऱ्या सेवांसाठी संस्थात्मक क्षमता विकसित करायला दर पाच वर्षांनी सामुदायिक आरोग्य केंद्रांसाठी (CHCs) 50 हजार रुपये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी (PHCs) 20 हजार रुपयांची आर्थिक सहाय्याची तरतूद अर्थसंकल्पात आहे. जिल्हा रुग्णालयांना ध्वनी उपचार कक्षासह उपकरणांसाठी 20 लाख रुपयांच्या आर्थिक सहाय्याची तरतूद आहे. हिंगोली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये श्रवणक्षमता मापन प्रयोगशाळेसाठी महाराष्ट्र राज्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1797746) अभ्यागत कक्ष : 191
Read this releasein: English , Urdu