भूविज्ञान मंत्रालय

वायू प्रदूषणाचे परिणाम

Posted On: 09 FEB 2022 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2022

 

सामान्य लोकांसाठी आणि प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांसाठी. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) हवेच्या गुणवत्तेची माहिती प्रदान करतो. हे अंदाज; https://mausam.imd.gov.in आणि https://ews.tropmet.res.in संकेतस्थळांवर उपलब्ध करून दिले जातात. पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) विकसित केलेला सफर- एअर (SAFAR-Air) हा वेब अनुप्रयोग चार महानगरांमध्ये (दिल्ली, पुणे, मुंबई आणि अहमदाबाद) स्थान संबंधित  हवा गुणवत्ता निर्देशांक आणि सल्ला देतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी ) आणि पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून  माहिती किंवा जागरूकता मोहीम उपलब्ध होऊ शकते.  नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई, अहमदाबाद आणि पुणे या शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेची माहिती दिली जात आहे

वाराणसी, लखनौ, अलाहाबाद, कोलकाता, बंगळुरू आणि पाटणा या शहरांमध्ये हवा गुणवत्ता माहिती सेवेचा विस्तार केला जात आहे.

पृथ्वी विज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Thakur/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796976) Visitor Counter : 479


Read this release in: English , Urdu