भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खोल सागरी मोहीमा (डीप ओशन मिशन)

Posted On: 09 FEB 2022 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2022

 

खोल सागरातील मोहीमांद्वारे (डीप ओशन मिशन मुळे) कॉर्पोरेट उद्योग सागरी संसाधनांचे अधिक शोषण करणार नाहीत आणि देशातील मच्छिमारांच्या जीवनमानावर आणि उपजीविकेवर त्यांचा कोणताही  परिणाम होणार नाही.  डीप ओशन मिशनचे उद्दिष्ट खोल समुद्रातील संसाधने शोधणे आणि त्यांचा शाश्वत उपयोग करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे आहे हे आहे.  भविष्यासाठी नवनवीन संसाधने शोधून काढणे आणि त्यांचा उपयोग करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे, जेणेकरून उपजीविकेसाठी अधिकाधिक संधी निर्माण होऊ शकतील, हा या उपक्रमाचा होणारा परिणाम आहे.

डीप ओशन मिशन जल अर्थव्यवस्थेशी (ब्लू इकॉनॉमीशी) संबंधित आहे.  डीप ओशन मिशनच्या उपक्रमांमुळे जलअर्थव्यवस्थेतील घटक उदाहरणार्थ मत्स्यपालन, पर्यटन आणि सागरी वाहतूक, नवीकरणीय  ऊर्जा, मत्स्यपालन, समुद्रातील उत्खनन मोहिमा आणि सागरी जैवतंत्रज्ञान या घटकांना त्याची  मदत होईल.

ही माहिती आज लोकसभेत एका लेखी उत्तरात पृथ्वी विज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.


* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796952) Visitor Counter : 212


Read this release in: English , Urdu , Urdu