संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मिशन सागर

Posted On: 07 FEB 2022 6:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली - दि. 07 फेब्रुवारी, 2022

कोविड-19 महामारीच्या काळामध्ये हिंद महासागराच्या किनारपट्टीवरील देशांना मदत करण्यासाठी भारत सरकारने पुढाकार घेऊन ‘मिशन सागर’ उपक्रम सुरू केला. या मिशनमध्ये भारतीय नौदलाने मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या 15 देशांमध्ये जहाजे तैनात केली. 215 पेक्षाही जास्त दिवस मिशन सागर उपक्रम चालवून यामध्ये मित्र देशांना 3000 मेट्रिक टन अन्नधान्याची मदत पुरविण्यात आली. तसेच 300 मेट्रिक टनांपेक्षाही जास्त द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन, 900 ऑक्सिजन काँन्सट्रेटर्स, आणि 20 आयएसओ कंटेनर्स यांची मदत पुरविण्यात आली. या मिशनमध्ये भारतीय नौदलाच्या जहाजांनी जवळपास 40,000 सागरी मैल (एनएम) एकत्रित अंतर पार केले.

भारतीय नौदलाच्या जहाजांनी इडाई (आडीएआय) चक्रीवादळानंतर मोझांबिकमधील बैरा शहरात अडकून पडलेल्या जवळपास 3,500 लोकांची सुटका केली. तसेच मोझांबिकमध्ये संकटात सापडलेल्या लोकांचा बचाव करून त्यांना वैद्यकीय सेवा आणि मदत पुरविली. आयएनएस मगर या नौदलाच्या जहाजाने एप्रिल, 2019 मध्ये बैरा आणि मोझांबिकमधील आपद्ग्रस्तांसाठी 250 टन तांदूळ आणि महामारीतून बचाव करण्यासाठी आवश्यक असणा-या सुमारे 500 टन औषधांचा पुरवठा केला. आयएनएस केसरीने डिसेंबर, 2021 मध्ये मोझांबिकला 500 टन अन्नधान्याची मदतही केली आहे. यासंबंधीचा तपशील खालील चौकटीमध्ये देण्यात आला आहे.

Sl No

Date

Countries

Remarks

(i)

May 2020

Maldives,

Mauritius,

Madagascar,

Comoros and

Seychelles

Medical teams, medicines and 580 tons of food aid

(ii)

October 2020

Djibouti,

Eritrea,

Sudan and

South Sudan

270 tons of food aid

(iii)

December 2020

Vietnam and

Cambodia

HADR aid, amounting to 15 tons each

(iv)

March 2021

Comoros and

Madagascar

1000 Tons of rice each

(v)

August 2021

Indonesia,

Thailand and

Vietnam

Indonesia – 100 MT Liquid Medical Oxygen (LMO), 300 Oxygen concentrator

Thailand – 300 Oxygen Cylinders

Vietnam – 100 MT LMO, 05 ISO containers & 300 Oxygen concentrators.

(vi)

August 2021

Sri Lanka

100 MT LMO & 05 ISO containers

(vii)

September 2021

Bangladesh

02 Mobile Oxygen Plants

(viii)

December 2021

Mozambique

500 tons of Food Aid

अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज- 7 फेब्रुवारी, 2022 रोजी राज्यसभेमध्ये संजय सेठ यांना लेखी उत्तरामध्ये दिली.

S.Tupe/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796257) Visitor Counter : 325


Read this release in: English , Urdu