वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान मित्र पार्क योजनेसाठी राज्य सरकारांकडून 15 मार्च 2022 पर्यंत प्रस्ताव मागविले


वस्त्रोद्योगांनी उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी दिलेली 31 जानेवारी 2022 पर्यंतची मुदत वाढवून 14 फेब्रुवारी 2022 करण्यात आली

Posted On: 02 FEB 2022 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2022

वस्त्रोद्योग क्षेत्राच्या समग्र विकासाच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेली पंतप्रधान मित्र योजना देशव्यापी स्वरुपात लागू होणार आहे. पंतप्रधान मित्र पार्क उभारण्यामध्ये स्वारस्य असलेल्या राज्य सरकारांकडून प्रस्ताव सादर झाल्यानंतर आव्हानात्मक पद्धतीने पार्कसाठीच्या योग्य जागेची निवड केली जाईल. राज्य सरकारांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह पंतप्रधान मित्र पार्क उभारण्यासाठीचे प्रस्ताव 15 मार्च 2022 पर्यंत सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे.

मानवनिर्मित धागे, वस्त्रप्रावरणे, कापडाचे तागे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिलेली उत्पादने यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीची 10,683 कोटी रुपये खर्चाची उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना मंजूर केली आहे. पंतप्रधान मित्र पार्कमधील पात्र कंपन्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्या कंपन्यांनी वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेचा लाभ घेतला नसेल केवळ अशाच उत्पादक कंपन्यांना पंतप्रधान मित्र पार्क योजनेअंतर्गत देण्यात येणारी स्पर्धात्मक प्रोत्साहन मदत उपलब्ध असेल. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेच्या ऑनलाईन पोर्टलवर या योजनेतील सहभागाच्या नोंदणीसाठीचे अर्ज सादर करण्याची मुदत आधी 1 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 होती त्यात मुदतवाढ दिली असून आता हे अर्ज 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करता येतील.

 केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोष यांनी लोकसभेत लिखित उत्तराद्वारे आज ही माहिती दिली.

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1794911) Visitor Counter : 191


Read this release in: English , Urdu