नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने निवासी ग्राहकांसाठी छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र स्थापित करण्यासाठी सोपी प्रक्रिया जारी केली आहे


संकेतस्थळे /सोशल मीडियावर प्रकाशित होत असलेल्या दिशाभूल करणाऱ्या फसव्या माहितीपासून दूर राहण्याचा सल्ला सामान्य जनतेला दिला

प्रविष्टि तिथि: 02 FEB 2022 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2022

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने निवासी ग्राहकांसाठी छतावरील   सौर ऊर्जा निर्मिती कार्यक्रम अंतर्गत स्वतःहून  किंवा त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही विक्रेत्याद्वारे छतावर  सौर ऊर्जा निर्मिती  संयंत्र स्थापित करण्यासाठी सोपी  प्रक्रिया जारी केली आहे.

नवीन सोप्या  प्रक्रियेतील सूचनांपैकी काही मार्गदर्शक सूचना  पुढीलप्रमाणे आहेत:

i.लाभार्थ्यांकडून अर्जांची नोंदणी, त्यांची मान्यता आणि प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी एक राष्ट्रीय पोर्टल विकसित केले जाईल. डिस्कॉमच्या स्तरावर तशाच  स्वरूपात एक पोर्टल असेल आणि दोन्ही पोर्टल एकमेकांशी जोडली जातील.

ii.नवीन प्रणाली अंतर्गत छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र  (RTS) स्थापित करू इच्छिणाऱ्या स्थानिक लाभार्थीना  राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करावा लागेल. . लाभार्थ्याने ज्यात अनुदानाची  रक्कम हस्तांतरित केली जाईल अशा बँक खात्याच्या तपशीलांसह आवश्यक माहिती सादर करणे आवश्यक आहे . अर्ज करताना , लाभार्थ्याला संपूर्ण प्रक्रिया आणि छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र  स्थापनेसाठी मिळू शकणार्‍या अनुदानाच्या रकमेबद्दल माहिती दिली जाईल.

iii.पुढील 15 कामकाजाच्या दिवसांत तांत्रिक व्यवहार्यता मंजूरीसाठी अर्ज संबंधित डिस्कॉमकडे  ऑनलाइन पाठविला जाईल. अर्ज डिस्कॉम कडे  हस्तांतरित केल्यानंतर तो डिस्कॉम पोर्टलवर देखील प्रदर्शित केला जाईल.

iv.तांत्रिक व्यवहार्यता प्राप्त केल्यानंतर, लाभार्थी डीसीआरच्या अटींची पूर्तता करणारे J3IS द्वारे प्रमाणित ALMM आणि इन्व्हर्टर अंतर्गत नोंदणी असलेले सोलर मॉड्यूल्स निवडून त्याच्या पसंतीच्या कोणत्याही विक्रेत्याकडून सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र  स्थापित करेल . निवड करण्यात आलेल्या  विक्रेत्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध केली जाईल.

v.सुमारे सहा ते आठ आठवड्यांत राष्ट्रीय पोर्टल विकसित होईल, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय पोर्टल कार्यान्वित होईपर्यंत, छतावरील सौर ऊर्जा संयंत्रांच्या  स्थापनेसाठी डिस्कॉमकडून  अनुदान मिळविण्याची विद्यमान प्रक्रिया सुरू राहील आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून  अनुदान मिळविण्यासाठी ही एकमेव अधिकृत प्रक्रिया असेल. राह्स्त्रीय  पोर्टल सुरु झाल्यानंतर  लाभार्थ्याकडे कोणत्याही पर्यायाची निवड करून  छतावर सौर ऊर्जा संयंत्र उभारण्याचा  पर्याय असेल.

vi.संकेतस्थळे /सोशल मीडियावर विशेषत: छतावरील सौरऊर्जा संयंत्रांच्या स्थापनेसाठी केंद्र  सरकारचे अनुदान मिळविण्यासाठी नोंदणी शुल्क किंवा इतर रक्कम  आकारणी बाबत कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या/फसव्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असा सल्ला सर्वसामान्यांना देण्यात येत आहे. यासंदर्भातील विश्वासार्ह माहिती मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर  www.mnre.gov.in किंवा SPIN पोर्टल www.solarrooftop.gov.in वर उपलब्ध केली जाईल.

प्रक्रियेसंबंधित अधिक तपशीलासाठी येथे क्लिक करा.

S.Patil/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1794909) आगंतुक पटल : 269
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी