ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रात पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेला निधी


पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 93 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी देण्यात आला

Posted On: 02 FEB 2022 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2022

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी वर्ष 2018-19 ते 2020-21 अशागेल्या तीन वर्षांच्या कालावधीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 93,494.83 कोटी रुपये (महाराष्ट्राला देण्यात आलेल्या 4260.96 कोटी रुपयांसह) देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांत पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून  बांधण्यात आलेल्या घरांची जिल्हानिहाय आकडेवारी परिशिष्टात दिली आहे.या योजनेतून सर्व राज्यांमध्ये उभारलेल्या घरांचे जिल्हानिहाय तपशील पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या https://www.pmayg.nic.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (ए1 अहवालाअंतर्गत आर्थिक वर्षात बांधून पूर्ण झालेली घरे)

ग्रामीण भागामध्ये, सर्वांसाठी घरे उभारण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय 1 एप्रिल 2016 पासून पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेची अंमलबजावणी करत आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलभूत सुविधा असलेली 2 कोटी 95 लाख घरे बांधण्याच्या उद्दिष्टासह ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना मदत पुरविली जात आहे.या योजनेसाठीचे पात्र लाभार्थी म्हणून  2011 साली केलेल्या सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणनेत मिळालेल्या माहितीवरून जे या योजनेतून मदत मिळण्यासाठीचे लाभार्थी ठरतात पण ज्यांचा समावेश त्या जनगणनेतील लाभार्थ्यांच्या यादीत नाही अशांचीच नावे निश्चित केले जातात. 2011 साली केलेल्या सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणनेमध्ये आणि आवास+ मध्ये संकलित माहितीच्या आधारावर  सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसेच महाराष्ट्राला पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घरे उभारण्यासाठी देण्यात आलेल्या वर्ष-निहाय उद्दिष्टांचा तपशील खाली दिला आहे:

Financial Year

2016-17

2017-18

2018-19

2019-20

2020-21

2021-22

All India Targets

42,33,011

31,54,507

25,13,662

58,62,199

44,24,610

61,02,372

 

 

Maharashtra

2,30,422

1,50,934

68,464

3,54,501

3,09,741

3,91,921

महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांत(2018-19 to 2020-21) पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून  बांधण्यात आलेल्या घरांची जिल्हा निहाय आकडेवारी:

S.No.

Name of the District

Total No. of houses constructed

(units in Nos.)

1

AHMEDNAGAR

19689

2

AKOLA

17474

3

AMRAVATI

33722

4

AURANGABAD

8677

5

BEED

5840

6

BHANDARA

18636

7

BULDHANA

9177

8

CHANDRAPUR

10922

9

DHULE

29082

10

GADCHIROLI

11579

11

GONDIA

59487

12

HINGOLI

4758

13

JALGAON

23162

14

JALNA

3643

15

KOLHAPUR

5740

16

LATUR

3953

17

NAGPUR

12167

18

NANDED

14156

19

NANDURBAR

63704

20

NASHIK

37363

21

OSMANABAD

1991

22

PALGHAR

16655

23

PARBHANI

2342

24

PUNE

6434

25

RAIGAD

4070

26

RATNAGIRI

2468

27

SANGLI

6503

28

SATARA

2973

29

SINDHUDURG

1692

30

SOLAPUR

11517

31

THANE

2469

32

WARDHA

5365

33

WASHIM

2904

34

YAVATMAL

15695

 

Total

4,76,009

केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लिखित उत्तराद्वारे राज्यसभेत आज ही माहिती दिली.

 

 

 

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1794908)
Read this release in: English , Urdu