पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यमापन प्राधिकरणांच्या मानांकनामुळे कोणत्याही नियामकीय सुरक्षितता कमी न करता निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल
ईआयए अधिसूचना 2006 मध्ये याआधीच निश्चित केलेल्या प्रक्रिया अथवा कालमर्यादा यांच्यात हे मानांकन बदल करत नाही.
मानांकनाचे निकष न पूर्ण केल्यास कोणताही उणे गुण देण्याच्या पद्धतीचा प्रस्ताव नाही
Posted On:
24 JAN 2022 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2022
राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यमापन प्राधिकरण ही राज्य पातळीवर पर्यावरण प्रभाव मूल्यमापन अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयाला उपयुक्त ठरणारी महत्त्वाची संस्था आहे आणि मंत्रालयाने ब वर्गाअंतर्गत सर्व प्रस्तावांच्या पर्यावरण विषयक परवानग्यांचा विचार करून त्या मंजूर करण्याचे अधिकार प्राधिकरणाला दिले आहेत.
मंत्रालयाने पर्यावरण विषयक परवानग्या देण्याची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आणि मंजुरीसाठी लागणारा अनावश्यक वेळ वाचविण्यासाठी तसेच पर्यावरण विषयक परवानग्या घेण्याच्या प्रस्तावांचे ऑनलाईन सादरीकरण आणि प्रक्रिया पूर्ण करणे, प्रस्ताव विस्तारासाठी आदर्श संदर्भ अटी, एकाच वेळी सर्व प्रश्न उपस्थित करणे आणि विविध ईडीएस/एसीएस टाळणे, दर पंधरवड्याला ईएसीबैठका घेणे यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यमापन प्राधिकरणांच्या कार्यात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी प्राधिकरणाची नवी मानांकने अस्तित्वात आणली आहेत. मानांकन पद्धत पर्यावरण प्रभाव मूल्यमापन अधिसूचना 2006 मधील तरतुदींवर आणि कोणत्याही नियामकीय सुरक्षितता कमी न करता पर्यावरण प्रभाव मूल्यमापन अधिसूचना 2006 मधील तरतुदींचे कडकपणे पालन करून निर्णय घेण्यातील क्षमता वाढविण्यासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यमापन प्राधिकरणाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित आहेत. पर्यावरण प्रभाव मूल्यमापन अधिसूचनेमध्ये सर्व पर्यावरणविषयक परवानगी प्रक्रियांची कालमर्यादा निश्चित केलेली आहे.
मात्र, मानांकनाचे निकष पूर्ण न केल्यामुळे कोणतीही उणे गुण पद्धती लागू करण्याचा प्रस्ताव नाही. राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यमापन प्राधिकरणाला कोणत्याही प्रकल्पाविषयी निर्णय घेण्यापूर्वी काल मर्यादेची काळजी न करता सर्व आवश्यक निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
संदर्भाच्या अटींमध्ये निश्चित केल्यानुसार, पर्यावरण प्रभाव मूल्यमापन प्राधिकरणाचे अहवाल तयार केले आहेत आणि त्याच्यावर आधारून प्रकल्पांना मानांकन दिले आहे. म्हणून मानांकन प्रणालीमुळे पर्यावरण प्रभाव मूल्यमापन प्राधिकरणाच्या अहवालांचा दर्जा खालावण्याचा प्रश्नच येत नाही. पर्यावरण प्रभाव मूल्यमापन प्राधिकरणाच्या मानांकनासाठी सात निकष लावण्यात आले आहेत. हे निकष आणि त्यांचे तार्किक स्पष्टीकरण तपशीलवारपणे इथे दिले आहे.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1792239)
Visitor Counter : 268