संरक्षण मंत्रालय

राष्ट्रीय युद्ध स्मारकावर ज्योती विलिनीकरण सोहळा

Posted On: 21 JAN 2022 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जानेवारी 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 फेब्रुवारी 2019 रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आणि त्याचे राष्ट्रार्पण करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आतापर्यंत देशासाठी आपल्या वीर जवानांनी केलेल्या सर्वोच्च त्यागाचे हे स्मारक प्रतीक आहे. या स्मारकाजवळ असलेली अखंड तेवत राहणारी ज्योती एका जवानाने केलेल्या सर्वोच्च बलिदानाचा दाखला देते आणि त्याला अमर करते. या स्मारकाचे उद्घाटन झाल्यावर राष्ट्रीय दिवसांसह सर्व प्रकारच्या अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन केवळ राष्ट्रीय युद्ध स्मारकावर करण्यात येते. आज एका समर्पक सोहळ्यामध्ये अमर जवान ज्योती येथील ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील चिरंतन ज्योतीमध्ये विलिन करण्यात आली. एकात्मिक संरक्षण दल प्रमुख एयर मार्शल बी आर कृष्णा या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते.   

 

* * *

S.Tupe/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1791675) Visitor Counter : 250


Read this release in: English , Urdu , Hindi