वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत- कोरिया व्यापारविषयक चर्चेबाबत संयुक्त प्रसिद्धीपत्रक
2030 पूर्वीच 50 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य पूर्ण करण्याचा भारत आणि कोरियाचा निर्धार
समावेशक आर्थिक भागीदारी करार अद्ययावत करण्यासाठीच्या वाटाघाटींवरील चर्चेला नव्याने वेग देण्याला भारत आणि कोरियाची संमती
Posted On:
11 JAN 2022 10:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या आमंत्रणावरून रिपब्लिक ऑफ कोरियाचे व्यापारमंत्री येओ हान-कू भारताच्या अधिकृत भेटीवर आले. व्यापारमंत्री येओ हान-कू यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली.
द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक यांच्याशी संबंधित सर्व मुद्यांवर दोन्ही मंत्र्यांनी तपशीलवार चर्चा केली. सीईपीए अर्थात समावेशक आर्थिक भागीदारी करार अद्ययावत करण्यासाठीच्या वाटाघाटींवरील चर्चेला नव्याने वेग देण्यात सहभागी होण्याबाबत तसेच दोन्ही देशांतील प्रमुख उद्योगांदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीसाठी लागोपाठ संवाद घडण्यास प्रोत्साहन देण्याबाबत भारत आणि कोरियाने संमती दर्शविली.
दोन्ही देशांमधील उद्योग क्षेत्राला ज्या अडचणींचा सामना करावा लागतो त्या खुलेपणाने सोडविण्याबाबत दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शविली आणि वाटाघाटी करण्यासाठी नेमलेल्या आपापल्या पथकांना एकमेकांच्या नियमितपणे भेटी घेऊन सीईपीए करार अद्ययावत करण्यासाठीच्या वाटाघाटी कालबद्ध पद्धतीने सर्व भागधारकांच्या मदतीने शक्य तितक्या लवकर संपविण्याचे निर्देश दिले जेणेकरून वर्ष 2018 मध्ये झालेल्या परिषदेत निश्चित करण्यात आलेले, 2030 पर्यंत 50 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे लक्ष्य साध्य करता येईल.
ह्या नियमितपणे होणाऱ्या वाटाघाटी म्हणजे दोन्ही देशांतील व्यापार समुदायांना येणाऱ्या अडचणींवर तसेच पुरवठा साखळीसह व्यापाराशी संबंधित नव्याने उदयाला येणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक मंच म्हणून कार्य करेल. भारत आणि कोरिया या दोन्ही देशांना परस्पर लाभदायक असलेला न्याय्य आणि समतोल पद्धतीने विकास साधण्यासाठी या दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यावर दोन्ही मंत्र्यांचे एकमत झाले.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1789265)
Visitor Counter : 226