अवजड उद्योग मंत्रालय
भारतातील वाहन आणि वाहनांसाठी लागणारे सुटे भाग यांच्या उद्योगांना लागू असणाऱ्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेसाठी एकूण 115 कंपन्यांकडून अर्ज दाखल
Posted On:
10 JAN 2022 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जानेवारी 2022
वाहन आणि वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांच्या भारतातील उद्योगांसाठी 23 सप्टेंबर 2021 रोजी उत्पादन संलग्न प्रोत्साहन निधी योजना जाहीर झाली होती. या योजनेंतर्गत आतापर्यंत 115 कंपन्यांनी अर्ज सादर केले आहेत.
या योजनेत अर्ज करण्याची मुदत 9 जानेवारी 2022 च्या मध्यरात्रीपर्यंत होती. या योजनेंतर्गत मिळणारा प्रोत्साहन निधी हा आधुनिक तंत्रज्ञानाधारित वाहने किंवा वाहनांसाठी लागणारे सुटे भाग यांच्या एक एप्रिल 2022 पासून सलग पाच वर्षे भारतात घेतल्या जाणार असलेल्या उत्पादनाच्या निर्धारित विक्रीवर लागू असेल.
अत्याधुनिक वाहन आणि वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांच्या उत्पादनांच्या भारतातील उद्योगांसाठी सरकारने रु. 25,938 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद असणारी उत्पादन सलग्न प्रोत्साहन निधी योजना जाहीर केली होती. या क्षेत्रामधील भारताचे उत्पादन क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट या योजने मागे आहे.
वाहने आणि वाहनांच्या सुट्ट्या भागाच्या निर्मितीसाठी प्रस्तावित उत्पादन संलग्न प्रोत्साहन निधी योजना आधुनिक वाहन तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने भारतात घेण्यासाठी पर्यायाने वाहन उत्पादन क्षेत्रात मूल्याधारित साखळी निर्माणाला व आर्थिक गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्याच्या प्रस्तावावर आधारित आहे.
या तंत्रज्ञानाच्या किंमतीसंबंधीच्या अडचणींवर मात करणे, वाहन उद्योगाशी संबंधित अर्थव्यवस्थेला व्यापक करणे आणि अत्याधुनिक वाहन तंत्रज्ञानाला मजबूत पुरवठा साखळी उभारणीसाठी सहाय्य तसेच रोजगार निर्मिती अशी मुख्य उद्दिष्टे या योजने मागे आहेत.
ही योजना वाहन उद्योगाला मूल्याधारित पुरवठा साखळीपासून ते अधिक मूल्यवर्धक उत्पादने घेण्यापर्यंत सर्व स्तरावर सहाय्यक ठरेल.
Sl. No.
|
Primary Category
|
Number of Applications
|
1
|
Champion OEM (Except 2W & 3W)
|
13
|
2
|
Champion OEM (2W & 3W)
|
7
|
3
|
New Non-Automotive Investor (OEM) Company
|
9
|
4
|
Component Champion
|
83
|
5
|
New Non-Automotive Investor (Component) Company
|
3
|
|
Total
|
115
|
* * *
S.Patil/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1789008)
Visitor Counter : 346