अर्थ मंत्रालय
21.74 कोटी रुपये मूल्याच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ घेणाऱ्या एका व्यक्तीला दक्षिण मुंबई सीजीएसटीकडून अटक
Posted On:
30 DEC 2021 9:13PM by PIB Mumbai
मुंबई, 30 डिसेंबर 2021
दक्षिण मुंबईच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयाने मेसर्स न्यू लक्ष्मीलाल अँड कंपनी (GSTIN 27ACAPS6257K1Z5) या मुंबईत गिरगाव येथे नोंदणी असलेल्या कंपनीच्या प्रोप्रायटरला 21.74 कोटी रुपये मूल्याच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ घेतल्याबद्दल आणि हस्तांतरित केल्याबद्दल अटक केली आहे. या व्यक्तीला 29-12-2021 रोजी मुंबईत अतिरिक्त मुख्य शहर दंडाधिकारी. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
तांबे आणि धातूच्या भंगाराच्या व्यवसायात असलेल्या या कंपनीची दक्षिण मुंबईच्या सीजीएसटीच्या करचुकवेगिरी प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर ही कंपनी मेसर्स नक्षत्र इम्पेक्स, मेसर्स भावना इम्पेक्स, मेसर्स लब्धी इम्पेक्स, मेसर्स रिषभ ट्रेडींग, मेसर्स भरत इंडस्ट्रीज, मेसर्स सिग्नेचर एंटरप्रायजेस आणि मेसर्स कनेक्ट स्टील इंडिया या अस्तित्वात नसलेल्या पुरवठादारांच्या नावावर बनावट पावत्यांच्या मदतीने बोगस इनपुट क्रेडीटचा लाभ घेतल्याचे आढळले.या कंपनीच्या प्रोप्रायटरने कोणत्याही मालाच्या हाताळणीविना सुमारे 11.07 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट चा लाभ घेतल्याचे आणि पुढे दिल्याचे मान्य केले आहे. दुसऱ्या एका कंपनीत म्हणजे मेसर्स लक्ष्मीलाल अँड कंपनी(GSTIN 27AJLPJ7761P1ZB) मध्ये त्याचा सहभाग असल्याचे आणि सुमारे 10.67 कोटी रुपये मूल्याच्या बनावट आयटीसीचा लाभ घेतल्याचे आढळले. या कंपनीची देखील नोंदणी दक्षिण मुंबईत आहे. या व्यक्तीने एकूण 21.74 कोटी रुपयांच्या जीएसटीचे दायित्व स्वीकारले आहे.
सीजीएसटी कायदा 2017 च्या 132 कलमान्वये वस्तू किंवा सेवेचा पुरवठा न करता इन्वॉईस किंवा बिल तयार करणे आणि चुकीच्या पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ घेणे किंवा वापर करणे हा जर हे व्यवहार पाच कोटी रुपयांच्या वर असतील तर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. आरोपीला सीजीएसटी कायदा 2017च्या 132(1)(क) या कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल या कायद्याचे कलम 69(1) अन्वये अटक करण्यात आली आहे.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1786431)
Visitor Counter : 158