संरक्षण मंत्रालय
आयएनएस सुदर्शीनी आखाती भागात तैनात
Posted On:
26 DEC 2021 10:23PM by PIB Mumbai
या प्रदेशातील मित्र नौदलांशी सागरी सहकार्य वाढविण्याच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, समुद्र प्रवास प्रशिक्षण नौका आयएनएस सुदर्शीनी, आखतात तैनात करण्यात आली.
एक महिन्याच्या या तैनातीत, या नौकेने मस्कत, दुबई आणि बंदर अब्बास या बंदरांना भेट दिली आणि रॉयल ओमान नौसेना, संयुक्त अरब अमिरात नौसेना आणि इराणचे इस्लामिक संघराज्य नौसेनेच्या अधिकाऱ्यांशी व्यावसायिक चर्चा केली.
गोवा शिपयार्ड लिमिटेड, येथे तयार करण्यात आलेल्या या नौकेने भारताच्या स्थानिक जहाज बांधणी क्षमतेचे प्रदर्शन केले आणि आखाती देशांशी असलेल्या भारताच्या ऐतिहासिक सागरी संबंधांच्या आठवणी जागवल्या. या तैनाती दरम्यान, या नौकेने, विविध परस्पर प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला, ज्यात ओमान आणि इराणच्या नौसेनेला प्रशिक्षण देण्यात आले तसेच समुद्रात गस्त घालण्यात आली. बंदरांना दिलेल्या भेटी दरम्यान या नौकेला उच्चस्तरीय शिष्ट मंडळाने तसेच तेथील भारतीय वंशाच्या लोकांनी भेट दिली. आयएनएस सुदर्शीनीवरील अधिकाऱ्यांनी सर्वोत्तम पद्धतींची माहिती देण्यासाठी नौदल नौका आणि अस्थापनांना भेटी दिल्या. नौकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रत्येक बंदराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय प्रशिक्षण सहकार्य, सागरी प्रवास प्रशिक्षण आणि परस्पर फायद्याच्या पैलूंवर वर चर्चा केली. या नौकेने रॉयल ओमान नौदल आणि इराणचे इस्लामिक संघराज्याच्या नौसेना यांच्यासोबत द्विपक्षीय सागरी सहकार्य अभ्यासात भाग घेतला आणि नौदलां समवेत सहकार्याची देवाणघेवाण केली.
***
G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1785394)
Visitor Counter : 219