सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

मुलांमधले न्यून लवकर लक्षात येणे महत्वाचे, त्यामुळे दिव्यांग मुलांचा  जास्तीत जास्त विकास सुनिश्चित होईल- केंद्रीय मंत्री रामदास आठवले


केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्र्यांनी नवी मुंबईत  दिव्यांग जनांसाठीच्या नव्या प्रादेशिक केंद्राचे केले उद्घाटन

Posted On: 24 DEC 2021 4:22PM by PIB Mumbai

 

मुलांमधले अपंगत्व लवकर लक्षात येणे महत्वाचे, त्यामुळे त्यांना लवकर सहाय्य पुरवून त्यांचा जास्तीत जास्त विकास सुनिश्चित करता येईल असे  केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मुले सहा महिन्यांची होण्यापूर्वी त्यांना डॉक्टरकडे नेण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले.यामुळे मुलांमध्ये काही न्यून असल्यास ते जाणून घेता येईल असे ते म्हणाले. नवी मुंबईत बौद्धिकदृष्ट्या  दिव्यांग सबलीकरणासाठीच्या (एनआयईपीआयडी) राष्ट्रीय संस्थेच्या नव्या प्रादेशिक केंद्राचे नवी मुंबईत उद्घाटन करताना ते आज बोलत होते. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाअंतर्गत 7 राष्ट्रीय संस्थांमध्ये सर्व प्रकारच्या अपंगत्वासाठी  सुरवातीच्या स्तरापासूनच  काम करणारी अर्ली इंटरव्हेन्शन केंद्र आणि 7 संयुक्त प्रादेशिक केंद्रे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारसाठी, दिव्यांगजन  हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असलेल्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र राहिले आहे असे आठवले यांनी सांगितले. दिव्यांगजनांच्या दृष्टीने इमारती सुलभ राहाव्यात यासाठी आपल्या सरकारने सुगम्य भारत  अभियान सुरु केले आहे.

कोविड-19 महामारीच्या काळातमानसिक आजार असलेल्या लोकांना सहाय्य आणि दिलासा देण्यासाठी सबलीकरण विभागाने किरण ही 24x7 सुरु राहणारी  निःशुल्क मानसिक आरोग्य पुनर्वसन हेल्पलाईन 13   भाषांमध्ये सुरु केली. अनेक दिव्यांगाकडे असाधारण प्रतिभा असते  आणि एनआयईपीआयडी सारख्या संस्था त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण पुरवतात ज्यामुळे त्यांना नोकरी मिळून ते स्वावलंबी बनतात असे एनआयईपीआयडीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करताना त्यांनी सांगितले.

सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक कोलकात्यामधल्या कार्यक्रमात सहभागी झाल्या, हाडे आणि स्नायू संदर्भातल्या अपंगासाठीच्या राष्ट्रीय संस्थेच्या दोन इमारतींचे उद्घाटन केले.

दिव्यांग असे नामकरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्गाचा सन्मान वाढवला आहे असे त्यांनी सांगितले. कोलकात्यामाधल्या या इमारती, दिव्यांगजनांच्या सर्व समावेशक विकासासाठी सहाय्य कारक ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईत बांधण्यात आलेली पाच मजली इमारत  3000  चौरस फुट क्षेत्रावर बांधण्यात आली असून त्यासाठी 14.67  कोटी रुपये खर्च आला आहे. विशेष शाळा,अर्ली इंटरव्हेन्शनउपचारविषयककौशल्य प्रशिक्षण,सभागृह, प्रशिक्षणार्थींसाठी वसतिगृह,कर्मचारी निवास यासह  56 खोल्या या इमारतीत आहेत.  सर्व दिव्यांगजनांना या इमारतीत सहजपणे वावरता येईल अशी या इमारतीची रचना आहे.

नवी मुंबई मधली ही इमारत कार्यान्वित झाल्यानंतर एनआयईपीआयडी प्रादेशिक केंद्राला महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये आपल्या सेवांचा विस्तार आणि बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व असलेल्या व्यक्तीच्या विकासासाठी कार्यक्रम राबवणे शक्य होईल.

कोलकाता इथल्या नव्याने बांधण्यात आलेल्या तीन मजली  वसतीगृह इमारतीत 57 खोल्या आणि 114 खाटा आणि स्वयंपाकघर आहे. यामध्ये  104 जण भोजनासाठी बसू शकतील अशी व्यवस्था आहे.

कोलकात्यामध्ल्या तीन मजली शैक्षणिक इमारतीत पदवी पर्यंतचे 110विद्यार्थी बसू शकतील  अश 4 मोठ्या वर्ग खोल्या, पदव्युत्तर वर्गाचे  20 विद्यार्थी बसू शकतील अशा 4 लहान खोल्या आणि 220 विद्यार्थी क्षमतेचा  परीक्षा वर्ग यांचा समावेश आहे.

रामदास आठवले आणि प्रतिमा भौमिक यांनी पात्र लाभार्थींना शिक्षणविषयक अध्यापन-अध्ययन साहित्याचे वितरण केले.

***

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1784987) Visitor Counter : 133


Read this release in: English