केंद्रीय लोकसेवा आयोग

संयुक्त संरक्षण विभाग सेवा परीक्षा (I) -2021 चे अंतिम निकाल

Posted On: 24 DEC 2021 4:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने फेब्रुवारी 2021 मध्ये घेतलेल्या संयुक्त संरक्षण विभाग सेवा परीक्षा आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखती यांच्या आधारावर देहरादून यथील भारतीय लष्करी अकादमी, केरळमधील एझीमाला येथील भारतीय नौदल अकादमी आणि हैदराबाद येथील हवाई दल अकादमी या संथामध्ये 152 व्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरलेल्या 154 (85+58+11) उमेदवारांच्या गुणवत्तेवर आधारित याद्या पुढे दिल्या आहेत.

2. विविध अभ्यासक्रमांसाठीच्या या तीन याद्यांमध्ये काही सामायिक विद्यार्थी आहेत.

3.  भारत सरकारने सूचित केल्यानुसार भारतीय लष्करी सेवेत 100, भारतीय नौदल सेवेत 26 आणि भारतीय हवाई दलात 32 पदे रिक्त आहेत.

4. आयोगाने भारतीय लष्करी सेवेत, भारतीय नौदल सेवेत आणि भारतीय हवाई दलात प्रवेश घेण्यासाठीच्या लेखी परीक्षेत अनुक्रमे 2679, 1136 आणि 637 उमेदवार पात्र ठरले होते. लष्करी मुख्यालयाने घेतलेल्या सेवा निवड मंडळाच्या मुलाखतींनंतरच अंतिमतः पात्र ठरलेले उमेदवार निश्चित करण्यात आले.

5. या याद्या तयार करताना वैद्यकीय तपासणीचे निष्कर्ष ग्राह्य धरण्यात आलेले नाहीत.

6.   या विद्यार्थ्यांच्या जन्मतारीख तसेच शैक्षणिक पात्रताविषयक कागदपत्रांची पडताळणी सुरु असल्याने उमेदवारांची निवड झाल्याची सध्याची यादी तात्पुरत्या स्वरुपाची आहे.उमेदवारांना  त्यांची मूळ कागदपत्रे सत्यप्रतींसह त्यांच्या पहिल्या पसंतीच्या संरक्षण मुख्यालयांकडे पाठविण्यास सांगितले आहे.

7. उमेदवाराच्या पत्त्यात झालेला बदल त्वरित लष्कर/नौदल अथवा हवाई दल मुख्यालयांना कळविणे आवश्यक आहे.

8. हे निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in  या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत. मात्र अधिकारी प्रशिक्षण अकादमीने संयुक्त संरक्षण विभाग सेवा परीक्षा (I), 2021 अंतिम निकाल जाहीर केल्यानंतरच या संकेतस्थळावर उमेदवारांचे गुण उपलब्ध होतील.

9. ही परीक्षा आणि मुलाखत यांच्या पुढील प्रक्रियेची माहिती अथवा स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी मुख्यालयातून   011-26173215 या क्रमांकावरून मिळविता येईल. अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी आयोगाच्या कार्यालयाच्या ‘C’ गेट जवळील  सुविधा केंद्राशी प्रत्यक्षपणे अथवा 011-23385271/011-23381125/011-23098543 या टेलीफोन क्रमांकावर कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 17.00 वाजेपर्यंत संपर्क साधावा.  

निकाल जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1784958) Visitor Counter : 168


Read this release in: English , Urdu , Tamil