संरक्षण मंत्रालय

संरक्षण संशोधन व विकास संघटनेने देशी बनावटीच्या एरियल टार्गेट ‘अभ्यास’ची यशस्वी उड्डाण चाचणी केली

Posted On: 23 DEC 2021 10:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2021

डीआरडीओ अर्थात  संरक्षण संशोधन व विकास संघटनेने स्वदेशी बनावटीच्या हाय -स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT)'अभ्यास' ची उड्डाण चाचणी आज चंदीपूर या ओदिशाच्या किनारपट्टीलगतच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमधून यशस्वीपणे पार पाडली. या उड्डाणचाचणी दरम्यान  सर्वात कमी उंचीवर उच्च दर्जाची सबसॉनिक स्पीड ट्रॅजेक्टरी आणि उच्च क्षमता राखण्यात आली.उड्डाणाच्या सुरुवातीस दोन बूस्टर्सकडून आरंभीचा वेग देण्यात आला आणि उच्च सबसॉनिक वेग राखण्यासाठी छोट्या  टर्बोजेट इंजिनचा वापर करण्यात आला. या उड्डाणाच्या वेळी बेंगळुरू येथील उद्योग  भागीदाराने रचना केलेल्या व देशांतर्गत विकसित डेटा लिंकचीही यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आली.
या प्रणालीने संपूर्ण उड्डाण कालावधीत विविध ठिकाणी आयोजित केलेल्या विविध रेंजच्या उपकरणातून माहिती गोळा करून आपली क्षमता सिद्ध केली.
एअरॉनॉटिकल विकास एस्टॅब्लिशमेंट बेंगळुरू येथील संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेच्या प्रयोगशाळेत तसेच संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेच्या इतर प्रयोगशाळांमध्ये ही मानवरहीत स्वदेशी एरिअल टार्गेट प्रणाली  विकसित करण्यात आली . भारतीय लष्करासाठी हवेतील लक्ष्य साधण्याच्या हेतूने हे विकसित करण्यात आले आहे. जमिनीवरील कंट्रोलरकडून तसेच स्वदेशी आणि एमईएमएस आधारित इनर्शल नेव्हिगेशन सिस्टिम तसेच फ्लाइट कंट्रोल कंम्प्यूटरकडून नियंत्रण करण्यात येते. यामुळे आधी निर्धारित केलेला मार्ग पुर्णपणे स्वयंशासित प्रकारे राखला जातो.
यशस्वी चाचणीमुळे वैज्ञानिक आणि उद्योग यामधील उल्लेखनीय समन्वय दिसून आला असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले.
DD R&D सचिव आणि संरक्षण व संशोधन विकास संस्थेचे अध्यक्ष यांनी प्रयोगशाळेतील वैज्ञानिक, त्यांचा चमू आणि त्यांच्याशी संबधित उद्योग क्षेत्रातील भागीदार यांना ‘अभ्यास’च्या  यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.

S.Kane/V.Sahjrao/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1784703) Visitor Counter : 285


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu