वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरण

Posted On: 22 DEC 2021 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2021

 

देशातील सर्व प्रकारचा किरकोळ व्यापार सुरळीतपणे चालण्यासाठी तसेच किरकोळ व्यापार क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारच्या प्रकारांचा विकास  करण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. किरकोळ व्यापार करणाऱ्या छोट्या उद्योग-व्यावसायिकांसाठी उद्योग सुलभ वातावरण निर्मिती, परवडणाऱ्या दरात पत उपलब्धता, किरकोळ व्यापाराचे आधुनिकीकरण आणि डिजिटलीकरणाची सुविधा, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधांची व्यसस्था,किरकोळ व्यापाराच्या वितरण साखळीदरम्यान प्रत्यक्ष पायाभूत सुविधा उभारणे, कौशल्य विकासाला प्रोत्साहन आणि कमंगर उत्पादकता वाढवणे, यातून, मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करणे, त्याशिवाय, किरकोळ व्यापार क्षेत्रातील लोकांसाठी एक सक्षम आणि प्रभावी सल्लाव्यवस्था, आणि तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करणे, कामार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे इत्यादी बाबींवर या आराखड्यात काम करण्यात आले आहे.

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1784199) Visitor Counter : 246


Read this release in: English , Urdu