माहिती आणि प्रसारण मंत्रालय
फोटो बातमी – II
केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भारतीय कंपनी सचिव संस्थेतील पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थिती
Posted On:
18 DEC 2021 9:21PM by PIB Mumbai
मुंबई, 18 डिसेंबर 2021
केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान त्यांनी आज संध्याकाळी मुंबईत आयसीएसआय अर्थात भारतीय कंपनी सचिव संस्थेत झालेल्या राष्ट्रीय कॉर्पोरेट प्रशासन पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहून विजेत्यांचा सन्मान केला.
आयसीएसआय राष्ट्रीय कॉर्पोरेट प्रशासन उत्कृष्टता पारितोषिके कंपन्यांच्या विविध श्रेणीअंतर्गत देण्यात आली.
खालील श्रेणींअंतर्गत इतर पारितोषिके देण्यात आली
- कॉर्पोरेट अनुपालन व्यवस्थापनाचे परिणामकारक साधन म्हणून सचिव पातळीवरील लेखा परीक्षण अहवालाचे महत्त्व अधोरेखित करण्याबद्दल सर्वोत्तम सचिव लेखापरीक्षण पारितोषिक
- कॉर्पोरेट सामाजिक दायित्व उत्कृष्टता पुरस्कार
- व्यावसायिक उत्कृष्टतेची पोचपावती देणारी उत्तम कामगिरी करणारी कंपनी सचिव संस्था
अपोलो रुग्णालयाचे संस्थापक डॉ.प्रताप सी रेड्डी यांना उत्तम कॉर्पोरेट प्रशासन तत्वांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आयसीएसआय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(या कार्यक्रमातील अधिक फोटो Twitter @icsi_cs येथे पाहता येतील)
M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1783121)
Visitor Counter : 209