वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
मोबाईल फोन्सची निर्यात आणि आयात
Posted On:
17 DEC 2021 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2021
मोबाइल फोनची निर्यात 2017-18 मधील 0.2 अब्ज अमेरीकी डॉलर्स वरून 2021 (21 एप्रिल-21 सप्टेंबर) मध्ये 1.7 अब्ज अमेरीकी डॉलर्सपर्यंत वाढली आहे. मोबाइल फोनची आयात 2017-18 मधील 3.5 अब्ज अमेरीकी डॉलर्सल वरून 2021 मध्ये (21 एप्रिल-21 सप्टेंबर) 0.5 अब्ज अमेरीकी डॉलर्सपर्यंत कमी झाली आहे.
मोबाइल फोनसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे देशांतर्गत उत्पादन आणि निर्यात वाढवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचललेली आहेत. मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (पीएलआय) तयार करणे, आयटी हार्डवेअरसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (पीएलआय), इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे घटक आणि अर्धवाहकाच्या (सेमीकंडक्टर) उत्पादनाला प्रोत्साहन देणारी योजना, इलेक्ट्रॉनिक्स संबंधित राष्ट्रीय धोरण 2019 अंतर्गत मॉडिफाईड इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन समूह (ईमसी 2.0), यामुळे भारताला इलेक्ट्रॉनिक्स, प्रणाली संरचना ( सिस्टीम डिजाइन) आणि निर्मिती क्षेत्रात जागतिक केन्द्र म्हणून स्थान भक्कम करण्यास मदत होईल.
याशिवाय, लागू कायद्यांच्या अधीन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी स्वयंचलित मार्गाने 100% पर्यंत थेट परदेशी गुंतवणुकीस (एफडीआयला) परवानगी आहे.
मोबाइल फोन आणि त्यांना लागणारे इतर पूरक भाग जोडणी/भागांच्या उत्पादनामध्ये देशांतर्गत मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी टप्प्याटप्प्याने उत्पादन कार्यक्रम (फेज्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम, पीएमपी) अधिसूचित करण्यात आला आहे. सेल्युलर मोबाइल फोन्ससह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी शुल्क संरचना देखील तर्कसंगत करण्यात आली आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री एस. अनुप्रिया पटेल यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Bedekar/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1782851)
Visitor Counter : 212